घरातील लाईट बिल येईल निम्म्यावर कमी? घरी वापरा NFC डिव्हाईस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:40 AM2023-03-16T10:40:57+5:302023-03-16T10:41:28+5:30
अनेकदा आपण आळशी बनून घरातील लाईट, फॅन, एसी किंवा इतर उपकरणे सुरूच ठेवतो
उन्हाळ्याला सुरुवात झाली की घरगुती वापराच्या लाईट बिलमध्ये मोठी वाढ होते. कारण, फ्रीज, पंखे, एसी यासंह अनेक उपकरणांच्या वापराचे प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे, लाईट बिल कमी करण्यासाठी या वस्तूंचा वापर कमी करण्यावर सर्वसामान्यांचा भर असतो. मात्र, सध्याच्या डिजिटल युगात सर्वकाही स्मार्ट झालंय. मग, तुम्हीही स्मार्ट बनून स्मार्टनेसचा वापर करुन घरच्या लाईट बिलमध्ये बचत करु शकता.
अनेकदा आपण आळशी बनून घरातील लाईट, फॅन, एसी किंवा इतर उपकरणे सुरूच ठेवतो. तसेच, एका रुममधून दुसऱ्या रुममध्ये जाण्याचा कंटाळा, दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाण्याचा कंटाळा आल्याने वस्तूंचा वापर वाढते अन् वीजबिलात वाढ होते. विनाकारणच्या या लाईट उपकरणांचा वापर थांबवल्यास तुमच्या घरचे बिल निम्म्यावर येऊ शकते. त्यासाठी, NFC डिव्हाईइस तुमची मदत करेल. विशेष म्हणजे ही चीप मार्केटमध्ये केवळ १२ रुपयांना उपलब्ध आहे. एकावेळी एकापेक्षा अधिक एनएफसी डिव्हाईसचा वापर करता येतो.
काय आहे NFC डिव्हाईस
एनएफसी म्हणजे नियर फिल्ड कम्युनिकेशन, जे ब्लुटूथसारखे असते. हा डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलवर काम करतो, याचा वापर कमी अंतरावरील डिव्हाईला कंट्रोल करण्यासाठी केला जाऊ शकतो. याचे सर्वाधिक दूरचे अंतर ४ सेमी एवढे आहे. यात सिग्नलिंगसाठी ट्रांसमिटिंग आणि सिग्नल रिसीव्हींगसाठी रिसीव्हींग डिव्हाईसचा वापर केला जातो.
काय होतो फायदा
दूरुनच घरातील बल्ब बंद करण्यासाठी या डिव्हाईचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, एसी, टीव्ही आणि घरातील इतर उपकरणेही दूरवरुन बंद करता येतात. या एनएफसी टॅगला युजर्स आपल्या मोबाई फोन, टीव्ही, एसी किंवा बल्बमध्येही लावू शकतात. त्यासाठी, ग्राहकांना NFC अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.