दिल्लीचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार? केजरीवाल नायब राज्यपालांची घेणार भेट; आपची आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 05:55 AM2024-09-17T05:55:59+5:302024-09-17T05:57:33+5:30
दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी काही नावांबाबत चर्चा केल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सांगितले.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली :आपच्या विधिमंडळ पक्षाची मंगळवारी सकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबद्दल चर्चा होईल. त्यानंतर अरविंद केजरीवाल नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा साेपविण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी रविवारी केली होती. त्यानंतर केजरीवाल यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर चर्चा रंगल्या आहेत. ते नाव उद्या किंवा परवा निश्चित होण्याची शक्यता आहे. केजरीवाल मंगळवारी संध्याकाळी साडे चार वाजता नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेणार आहेत.
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी काही नावांबाबत चर्चा केल्याचे आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोमवारी सांगितले.
‘आप’च्या आमदारांतूनच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड
आपच्या आमदारांमधूनच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे. आमदार नसलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर बसविण्याचा प्रयोग अरविंद केजरीवाल सध्या करण्याची शक्यता नाही, असे त्या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता या मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. केजरीवाल यांच्याशी निष्ठावान असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. यात आतिशी, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांची नावे शर्यतीत आहेत.