वॉन्टेड झाकिर नाईकला भारतात आणलं जाणार? मलेशियन पंतप्रधानांच्या एका आश्वासनानं वाढली भारताची आस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 04:18 PM2024-08-21T16:18:49+5:302024-08-21T16:19:47+5:30
इब्राहीम दिल्ली येथे आयोजित 'इंडियन काउंन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स'च्या सत्रादरम्यान बोलत होते.
जर भारताने वादाग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकिर नाईकविरोधात पुरावे दिले, तर आपले सरकार त्याला प्रत्यार्पित करण्यासंदर्भात भारताच्या विनंतीवर विचार करू शकते, असे संकेत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दिले आहेत. तसेच, या मुद्द्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या विस्तारात कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. इब्राहीम दिल्ली येथे आयोजित 'इंडियन काउंन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स'च्या सत्रादरम्यान बोलत होते.
एका प्रश्नाला उत्तर देताना इब्राहिम म्हणाले, मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान भारताने हा मुद्दा उपस्थित केला नाही. नाईक कथित मनी लॉन्ड्रिंग आणि द्वेषपूर्म भाषणांच्या माध्यमाने कट्टरता भकावण्याच्या प्रकरणात भारताला हवा आहे. तो गेल्या 2016 मध्ये भारतातून पळून गेला होता. महातिर मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील माजी सरकारने त्याला मलेशियामध्ये कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिली होती.
दहशतवादाला प्रोत्साहन देणार नाही -
अन्वर इब्राहिम म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे, हा मुद्दा भारताकडून उस्तित करण्यात आला नाही. पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) हा मुद्दा फार पूर्वी उपस्थित केला होता. काही वर्षांपूर्वी... मात्र, मुद्दा असा आहे की, मी एका व्यक्तीसंदर्भात बोलत नाही, मी दहशतवादी भावनेसंदर्भात बोलत आहे. एक ठोस पुराव्यासंदर्भात बोलत आहे. जो एखादी व्यक्ती, समूह किंवा गट अथवा पक्षाद्वारे केलेल्या अत्याचाराचे संकेत देत असेल. जो एखादी व्यक्ती, समूह किंवा गट अथवा पक्षाकडून केले गेलेले महापाप सिद्ध करेल."