Akhilesh Yadav: लोकसभा निवडणुकीपूर्वी बनणार तिसरी आघाडी? अखिलेश यादवांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 10:45 PM2023-06-06T22:45:08+5:302023-06-06T22:46:04+5:30
Akhilesh Yadav: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीप्रीव तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीप्रीव तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचे संकेत दिले आहे. त्यांनी दिल्लीमध्ये प्रशासनासंदर्भातील वादात त्यांनी अरविंद केजरीवाल यांना समर्थन दिलं आहे. त्याबरोबरच कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून अखिलेश यादव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच २०२४ पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याचे आणि प्रचार अभियानाचे नेतृत्व करण्याचे संकेत अखिलेश यादव यांनी दिले आहे.
अखिलेश यादव यांनी सांगितले की, मी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार आहे. निवडणूकही लढणार आहे. दोन्ही कामं होतील, पण राजकारणामध्ये रिकामी का बसायचं. हेच शिकलोय आणि हेच करत राहणार आहे. ओदिशा दुर्घटनेवरही अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेनमध्ये इतरे मॉर्डन पार्ट्स लागले आहेत. कवचबाबत बोललं जात होतं. मात्र हे कवच नाही आहे. तर भाजपाचं कपट आहे. ज्यांना नोकरी मिळणार होती. त्यांना सुरक्षारक्षकाची कामही मिळत नव्हती.
दरम्यान, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर अखिलेख यादव यांनी सांगितले की, मला वाटतं की, विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यावर काही ना काही अवश्य विचार करतील. एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे केंद्र सरकार अधिकार हिरावत आहे. जर कुठल्याही सरकारचे अधिकार हिरावले जात असतील तर विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे.