'त्या' ९ बँका खरंच बंद होणार?; रिझर्व्ह बँक म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 06:52 IST2019-09-26T04:19:43+5:302019-09-26T06:52:07+5:30
बँका बंद होणार असल्याच्या चर्चेने खातेदारांमध्ये प्रचंड घबराट

'त्या' ९ बँका खरंच बंद होणार?; रिझर्व्ह बँक म्हणते...
मुंबई : पंजाब व महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणल्यानंतर आणखी काही बँका बंद करण्याचा विचार सुरू आहे, या वृत्ताचा रिझर्व बँकेने इन्कार केला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक, सेंट्रल बँक, युनायटेड बँक, कॉर्पोरेशन बँक, युको बँक, आयडीबीआय, आंध्र बँक व इंडियन ओव्हरसीज बँक बंद करण्याचे वृत्त सर्वत्र पसरल्यामुळे खातेदारांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ सचिव राजीव कुमार म्हणाले की, काही बँका बंद करण्यात येणार असल्याचे वृत्त खोडसाळ आहे.
काही सरकारी बँका बंद करणार असल्याच्या वृत्तामध्येही अजिबात तथ्य नाही. किंबहुना सरकारी बँका अधिक भक्कम करण्यात येणार असून, त्यामुळे त्या आपल्या खातेदारांना अधिक चांगली सेवा देऊ शकतील, असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.