ेमसापची आजची बैठक वादळी ठरणार?
By admin | Published: May 26, 2015 02:03 AM2015-05-26T02:03:19+5:302015-05-26T02:03:19+5:30
पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वर्धापन दिना निमित्त ग्रंथ, साहित्यीक आणि साहित्य क्षेत्राची सेवा करणा-यां विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाही विविध पुरस्कारांची घोषणा परिषदेने केली खरी; मात्र काही पुरस्कार कार्यकारिणीला विश्वासात न घेताच जाहिर करण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे मसापची आज (मंगळवार) होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
Next
प णे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने वर्धापन दिना निमित्त ग्रंथ, साहित्यीक आणि साहित्य क्षेत्राची सेवा करणा-यां विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाही विविध पुरस्कारांची घोषणा परिषदेने केली खरी; मात्र काही पुरस्कार कार्यकारिणीला विश्वासात न घेताच जाहिर करण्यात आल्याने सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे मसापची आज (मंगळवार) होणारी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.दरवर्षीप्रमाणे मसापचा वर्धापनदिन उद्या ( बुधवारी) साजरा होत आहे. यानिमित्त दरवर्षी देण्यात येणा-या ग्रंथ पुरस्कारांसाठी प्रवेशिका मागविण्यात येतात तर उर्वरीत पुरस्कारांबाबत साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन कोणाला पुरस्कार द्यायचा यावर चर्चा होते. यंदा मात्र पुरस्कारांसाठी कार्यकारिणीची बैठक न घेताच मसापच्या पुण्यातील पदाधिका-यांनी परस्पर पुरस्कारार्थींची नावे जाहिर केल्याने कार्यकारिणी सदस्यांमध्ये नारजीचे वातावरण आहे. पदाधिका-्यांनी आगामी वर्षी होणारी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन पुरस्कारांची खैरात केल्याचा आरोप शहराबाहेरील कार्यकारिणी सदस्यांनी केला आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल,भाषिक कार्याबद्दल मसापच्या वतीने कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मसापचे माजी पदाधिकारी कै. भिमराव कुलकर्णी यांच्या नावाने देण्यात येतो या पुरस्कारासाठी साहित्य परिषदेच्या शाखेतील सक्रिय कार्यकत्यार्ची निवड करण्यात येते मात्र यंदा ज्या कार्यकत्यार्ला हा पुरस्कार जाहिर झाला आहे ती मसापची सातारा जिल्ातील शाखा मागील अनेक वर्षांपासून बंद आहे तरीही त्या शाखेला कार्यकर्ता पुरस्कार दिल्याने कार्यकारिणी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असून आजची बैठक या पुरस्कारांच्या मुद्यावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. -----------------------------------------------------------------------------------------------------------