मोबाईल वॉलेटचा ट्रेंड कधीपर्यंत टिकणार ?

By admin | Published: January 5, 2017 11:03 PM2017-01-05T23:03:34+5:302017-01-05T23:03:34+5:30

मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात.

Will the trend of mobile wallet last long? | मोबाईल वॉलेटचा ट्रेंड कधीपर्यंत टिकणार ?

मोबाईल वॉलेटचा ट्रेंड कधीपर्यंत टिकणार ?

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 5 - मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात असून, दैनंदिन व्यवहारही ब-याचदा मोबाईलवरूनच केले जातात. मोबाईल वॉलेटही आता वापरकर्त्यांसाठी जीवनाचा एक भाग बनलं आहे. अनेकदा लोक कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मोबाईल वॉलेटचा वापर करतात. मोबाइलच्या माध्यमातूनच फोन रिचार्ज, टॅक्सीचं बिल भरणं अशी कामे करतात. मोबाइल वॉलेटमुळे बँकेच्या बाहेर रांग न लावता स्वतःची सर्व कामे होतात. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, यूएसएसडी, आधार कार्डवर आधारित भीम अ‍ॅप्लिकेशन लोकांच्या सेवेत आहेत. ई-वॉलेटमुळे बिल भरणं, तिकीट बुक करणं, कॅबचं पेमेंट करणं सर्वकाही सहजशक्य झालं आहे.

मोबाईलमध्ये पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक, एअरटेल मनी, व्होडाफोन एम-पैसा, ऑक्सिजन वॉलेट, चिल्लर, पेयूमनी असे अनेक ई-वॉलेट कार्यरत आहेत. या सर्व अ‍ॅप्समध्ये पेटीएम हे सध्या आघाडीवर आहे. पेटीएमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्स, फूटवेअर आणि कॅशबॅकसारखे ऑफरचाही आपण फायदा घेऊ शकतो. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला आता यूनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीही वापरता येणार आहे. ही नवी प्रणाली एनपीसीआयने विकसित केली आहे. यूपीआयमार्फत पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला स्मार्टफोनवर यूपीआय अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागत असून, मोबाईल नंबरची नोंद करावी लागते. त्यासाठी तुम्हाला आधार नंबर देणंही गरजेचं असेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँकेकडून यूनिक यूपीआय कोड पाठवला जाणार आहे.

तसेच हा नंबर म्हणजे तुमच्या बँकेचा पत्ता स्वरुपात असणार आहे. तुम्हाला ज्या बँकेत पैसे पाठवायचे आहेत, त्याचाही यूपीआय नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीकडेही यूपीआयशी जोडलेल्या कोणत्याही बँकेचं अ‍ॅप असणं गरजेचं आहे. तुम्हाला ई-कॉमर्स कंपनीचा यूनिक आयडी नंबर द्यावा लागेल. याशिवाय याच्या माध्यमातून तुम्ही फोन बिल, गॅस बिल, मोबाईल फोन रिचार्ज आदींचे पेमेंट करणे शक्य होणार आहे. मात्र याचे काही तोटेही आहेत. ही मोबाईल वॉलेट कितीपत सुरक्षित आहेत हाच खरा प्रश्नच आहे. मोबाईल हरवल्यास डेटा चोरी होण्याची भीती असते, तर बॅलन्स ट्रान्सफर होण्याचीही शक्यता असते. या यूपीआय प्रणालीच्या सुरक्षेबाबतही अनेक जाणकारांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे मोबाईल वॉलेट किती सुरक्षित आहे, हे येत्या काळातच समजणार आहे.

Web Title: Will the trend of mobile wallet last long?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.