ट्विटरमध्ये एडिटचा पर्याय मिळणार?

By admin | Published: December 31, 2016 02:23 AM2016-12-31T02:23:53+5:302016-12-31T02:23:53+5:30

ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये काही चुकले, तर ते थेट डिलीट करण्याचाच एकमेव पर्याय होता. ट्विट दुरुस्त करण्याची सोय नव्हती. पण ही समस्या लवकरच सुटणार आहे.

Will Twitter get the option of Twitter? | ट्विटरमध्ये एडिटचा पर्याय मिळणार?

ट्विटरमध्ये एडिटचा पर्याय मिळणार?

Next

नवी दिल्ली : ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये काही चुकले, तर ते थेट डिलीट करण्याचाच एकमेव पर्याय होता. ट्विट दुरुस्त करण्याची सोय नव्हती. पण ही समस्या लवकरच सुटणार आहे. ट्विटकरांना आता आपला मजकूर-ट्विट एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक दोरसे यांनी एडिटचा पर्याय देण्याची गरज असल्याचे मान्य केलं आहे. अर्थात एडिटचे फिचर असावे, हे त्यांनी मान्य केले असले तरी ही सोय कधी मिळेल, याचा खुलासा त्यांनी केलेला नाही.
ट्विटरमध्ये २0१७ साली काय सुधारणा कराव्यात, कोणत्या बाबी समाविष्ट कराव्यात, याबाबत दोरसे यांनी प्रतिक्रिया मागवल्या होत्या. या प्रश्नांच्या उत्तरात अनेकांनी ट्विट एडिट करण्याचा पर्याय असावा, अशी विनंती केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Will Twitter get the option of Twitter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.