पाच वर्षांत तुमची नोकरी जाणार का?; क्लार्क, कॅशिअर्सच्या नोकऱ्या घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 08:12 AM2023-05-04T08:12:39+5:302023-05-04T08:13:01+5:30

भारतातील रोजगारांचे स्वरूप बदलून टाकण्यात एआय आणि मशीन लर्निंग विशेषज्ञ, डेटा विश्लेषक, तसेच वैज्ञानिक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत

Will you be out of a job in five years?; Jobs of clerks, cashiers will decrease | पाच वर्षांत तुमची नोकरी जाणार का?; क्लार्क, कॅशिअर्सच्या नोकऱ्या घटणार

पाच वर्षांत तुमची नोकरी जाणार का?; क्लार्क, कॅशिअर्सच्या नोकऱ्या घटणार

googlenewsNext

अत्याधुनिक तंत्रज्ञान, आयटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या वापरामुळे कंपन्यांमधील उत्पादन प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ या घटकांवर आमूलाग्र परिणाम होत आहेत. याचेच प्रतिबिंब वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर जॉब्स २०२३ या अहवालात उमटलेले दिसते. या अहवालानुसार येत्या ५ वर्षांत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ६.९ कोटी नवे रोजगार उपलब्ध होतील, तर ८.३ कोटी लोक यामुळे बेकार होतील. 

भारतातील रोजगारांचे स्वरूप बदलून टाकण्यात एआय आणि मशीन लर्निंग विशेषज्ञ, डेटा विश्लेषक, तसेच वैज्ञानिक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. देशातील ६१ टक्के कंपन्यांना असे वाटते की, नव्या धोरणांमुळे रोजगारांमध्ये वाढ होईल. नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे ५९ टक्के कंपन्यांना वाटते, तर डिजिटलच्या व्यापक वापरामुळे नोकऱ्या वाढतील असे ५५ टक्के कंपन्यांना वाटते. 

शिक्षण आणि शेतीमध्ये संधी 
nशिक्षण क्षेत्रात १० टक्के रोजगार वाढीमुळे तब्बल ३० लाख नवे रोजगार निर्माण होतील. 
nकृषी विशेषज्ञ, उपकरणे, तसेच अवजारे यांचे ऑपरेटर आदी नोकऱ्यांमध्ये एक तृतीयांशने वाढ होईल.  
nई- कॉमर्स विशेषज्ञ, डिजिटल मार्केटिंग,  स्ट्रॅटेजी स्पेशालिस्ट आदी नोकऱ्यांमध्ये ४० टक्के नव्या संधी निर्माण होतील. 

असे चित्र बदलणार (प्रमाण %मध्ये) 
प्रभाव टाकणारे घटक     भारत    जग 
एआय व मशीन लर्निंग विशेषज्ञ    ३८    ४० 
डेटा विश्लेषक आणि वैज्ञानिक    ३३    ३४ 
बिझनेस डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स    २४    २४ 
प्रोजेक्ट मॅनेजर्स    २२    २५ 
    (स्रोत : डब्ल्यूडब्ल्यूएफ) 

क्लार्क, कॅशिअर्सच्या नोकऱ्या घटणार

येत्या काळात क्लाउट कम्प्युटिंग, बिग डेटा आणि एआयसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काही विद्यमान नोकऱ्यांवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. क्लार्क, कॅशिअर्स, डेटा एंट्री ऑपरेटर्स, अकाउंटिंग व बुक कीपिंगमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या नव्या तंत्रज्ञानामुळे धोक्यात येणार आहेत.

Web Title: Will you be out of a job in five years?; Jobs of clerks, cashiers will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.