दिवाळीत कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:08 AM2024-10-21T10:08:05+5:302024-10-21T10:08:53+5:30

कुठून सुटणार एक्स्प्रेस? वाचा सविस्तर

Will you get a confirmed ticket in Diwali? 570 special services for passengers; Measures to avoid overcrowding | दिवाळीत कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी उपाय

दिवाळीत कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्ये रेल्वेने राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर विभागातून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या एकूण सेवांपैकी ४२ सेवा शनिवारपर्यंत पूर्ण झाल्या आहेत. या सर्व विशेष सेवा ८५ एक्स्प्रेस गाड्यांद्वारे दिल्या जाणार असून, त्यात वातानुकूलित विशेष, वातानुकूलित, शयनयान आणि जनरल डब्यांच्या मिश्र डबे असलेल्या व अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.

१०८ सेवा राज्यात...

मध्य रेल्वेच्या ५७० फेस्टिव्हल स्पेशल सेवांपैकी १०८ सेवा राज्यातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणी चालविल्या जाणार आहेत. तर, ३७८ सेवा या उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी अशा विविध भागांतील प्रवाशांसाठी असतील. 

कुठून सुटणार एक्स्प्रेस

उत्तरेकडे जाणाऱ्या एकूण सेवांपैकी १३२ सेवा मुंबईतून, १४६ सेवा पुण्यातून, तर उर्वरित १०० सेवा इतर ठिकाणांहून चालविल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे भारताच्या दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष सेवा सोडणार आहे. त्यात करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बंगळुरूसारख्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ८४ सेवा चालविण्यात येणार आहेत.

Web Title: Will you get a confirmed ticket in Diwali? 570 special services for passengers; Measures to avoid overcrowding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.