जिंकण्यासाठीच युद्धात उतरायचे, राजकारण प्रवेशाचा निर्णय रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 04:02 AM2017-12-27T04:02:41+5:302017-12-27T04:02:52+5:30
चेन्नई : युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते, असे सूचित करत, आपण राजकारणात उडी घेणार की नाही याचा निर्णय ३१ डिसेंबर रोजी जाहीर करू, असे तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी सांगितले.
चेन्नई : युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते, असे सूचित करत, आपण राजकारणात उडी घेणार की नाही याचा निर्णय ३१ डिसेंबर रोजी जाहीर करू, असे तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी सांगितले.
नाताळानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या चाहत्यांच्या मेळाव्यात रजनीकांत म्हणाले, राजकारणातील अडचणी मला माहीत आहेत. मला त्यांची कल्पना नसती तर मी राजकारणात यापूर्वीच उडी घेतली असती. युद्धात उतरायचे तर ते जिंकण्यासाठीच उतरायचे असते. युद्ध जिंकण्यासाठी केवळ शक्ती नव्हे, तर युक्तीही लागते. याआधी आपण सन १९९६मध्ये द्रमुकला मते देऊन जयललिता यांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले होते त्याचा संदर्भ देत रजनीकांत म्हणाले, खरेतर मी त्याच वेळी राजकारणात उतरलो होतो. त्यामुळे राजकारण मला नवीन नाही.