काँग्रेसला विजयी करा आणि सरकारी नोकरी मिळवा

By admin | Published: July 14, 2016 03:08 AM2016-07-14T03:08:30+5:302016-07-14T03:08:30+5:30

पंजाबमधील अकाली दल-भाजपाच्या सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी आतूर असलेल्या काँग्रेसच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे

Win the Congress and get government jobs | काँग्रेसला विजयी करा आणि सरकारी नोकरी मिळवा

काँग्रेसला विजयी करा आणि सरकारी नोकरी मिळवा

Next

नवी दिल्ली : पंजाबमधील अकाली दल-भाजपाच्या सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी आतूर असलेल्या काँग्रेसच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे, केजरीवालांचा आम आदमी पक्ष. काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या समस्येवर मात करण्यासाठी राज्यात प्रत्येक गरजवंत कुटुंबाला एक सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनाचा आक्रमक डाव खेळायचे ठरवले आहे.
केजरीवालांच्या ‘आप’ ने तरुणांवर मोहिनी घालणारे अनेक प्रयोग पूर्वीच सुरू केले आहेत. काँग्रेसने अमरिंदरसिंगांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर ‘कॉफी वुइथ कॅप्टन’, ‘प्रत्येक मतदारसंघात कॅप्टन’ यासारख्या कार्यक्रमांचा धूमधडाका उडवून दिला. या कार्यक्रमातून, तसेच निरनिराळ्या सर्वेक्षणातून एकच महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसच्या लक्षात आला, पंजाबमधील बेरोजगारीची समस्या. त्यामुळे काँग्रेसने आता निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवण्याचे ठरवले आहे.
प्रत्येक मतदानकेंद्रासाठी युवक काँग्रेसचे दोन कार्यकर्ते तयार केले आहेत. हे कार्यकर्ते सध्या एक छापील फॉर्म घेऊन त्यांना ठरवून दिलेल्या मतदानकेंद्राच्या क्षेत्रातील मतदारांच्या घरोघरी फिरत आहेत. घरात सुशिक्षित बेरोजगार किती? मुलगा आहे की मुलगी? त्यांची शैक्षणिक पात्रता काय? सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे काय? पूर्वी किंवा सध्या घरातले कोणी सरकारी नोकरीत होते किंवा आहे काय? असे प्रश्न व फॉर्म भरणाऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल नंबर या फॉर्ममध्ये आहेत. फॉर्म भरल्याची पोचही देण्यात येते.
पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या नशेशी झुंज देणाऱ्या तरुणांना रोजगार देण्याचे अभिवचन आम आदमी पक्षाने या पूर्वी दिले. त्यावर मात करण्यासाठी गरजू कुटुंबात प्रत्येकी बेरोजगाराला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे वचन आपल्या प्रचारात आणि जाहीरनाम्यात काँग्रेस देणार आहे.
यातून काँग्रेस दोन गोष्टी साध्य करणार आहे. एक तर बेरोजगार तरुणांमध्ये सरकारी नोकरीची आकांक्षा निर्माण करणे आणि दुसरे म्हणजे बेरोजगारांचा अद्ययावत डेटाबेस तयार करणे. निवडणूक प्रचारात व्हॉटसअ‍ॅप, ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस या डेटाबेसद्वारे तरुणांशी संवाद साधणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पक्षातर्फे याच मुद्द्यावर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Win the Congress and get government jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.