मध्य प्रदेशात विजय; काँग्रेसचे बदलाचे संकेत
By Admin | Published: November 25, 2015 04:04 AM2015-11-25T04:04:50+5:302015-11-25T04:04:50+5:30
मध्य प्रदेशच्या रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघात दीर्घ कालावधीनंतर विजय नोंदवत काँग्रेसने बदलाचे वारे वाहत असल्याचे संकेत दिले. काँग्रेसने ही जागा भाजपाकडून हिसकावली
पोटनिवडणूक निकाल
नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या रतलाम-झाबुआ लोकसभा मतदारसंघात दीर्घ कालावधीनंतर विजय नोंदवत काँग्रेसने बदलाचे वारे वाहत असल्याचे संकेत दिले. काँग्रेसने ही जागा भाजपाकडून हिसकावली. तेलंगणमधील वारंगल (राखीव) लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने विजय मिळवत जागा कायम राखली.
मध्य प्रदेशच्या देवास लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गायत्री राजे पवार यांनी विजय मिळवत ही जागा भाजपाकडे कायम राखली. त्यांनी काँग्रेसचे जयप्रकाशी शास्त्री यांचा पराभव केला. रतलाम-झाबुआमध्ये काँग्रेसचे कांतिलाल भुरिया यांनी भाजपाच्या निर्मला भुरिया यांचा पराभव केला. तेलंगणमधील वारांगलमध्ये टीआरएसचे पसनुरी दयाकर यांनी काँग्रेसचे एस. सत्यनारायण यांना पराभवाचा धक्का दिला. मिझोरममधील ऐजवाल उत्तर-३ विधानसभा मतदारसंघात माजी आरोग्यमंत्री लाल थनझरा यांनी विजय मिळविला.
मणिपूरमधील पोटनिवडणुकीत दोन जागा जिंकत भाजपाने आपले खाते उघडले. इम्फाल पूर्व मतदारसंघात भाजपाचे विश्वजीतसिंग यांनी काँग्रेसचे बिजॉय कोईजम यांचा पराभव केला. इम्फाल पश्चिममध्ये भाजपाचे खुमुकचाम जॉयकिशन यांनी काँग्रेसचे ज्योतीन वाईखोम यांचा पराभव केला. मणीपूर विधानसभेत आता भाजपाचे दोन सदस्य झाले.