बेल्हा परिसरात वादळी पावसाने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:40+5:302016-06-08T01:50:40+5:30

बेल्हा : परिसरात नुकत्याच झालेला वादळी पाऊस व जोरदार वादळ यांमुळे चारापिके, केळी, आंब्याचे व डाळिंबाचे नुकसान झाले.

Windy rain damages in Belha area | बेल्हा परिसरात वादळी पावसाने नुकसान

बेल्हा परिसरात वादळी पावसाने नुकसान

Next
ल्हा : परिसरात नुकत्याच झालेला वादळी पाऊस व जोरदार वादळ यांमुळे चारापिके, केळी, आंब्याचे व डाळिंबाचे नुकसान झाले.
परिसरात सोमवारी (दि. ६) वादळी वार्‍यासह व ढगांच्या गडगडाटासह जोराचा पाऊस झाला. या वेळी वीजपुरवठाही खंडित झाला होता. या वादळी वार्‍यामुळे गुळूंचवाडी येथे सीताराम देवकर याच्या आंब्याच्या झाडाच्या कैर्‍या गळून पडल्या. कैर्‍यांचा सडाच सगळीकडे पडला होता. तसेच, काही शेतकर्‍यांच्या शेतातील उभी चारापिके शेतातच आडवी पडली. तर, रमेश पिंगट यांच्या जवळपास १५० केळींचे व संतोष बोरचटे (खराडीमळा) यांच्याही शेतात उभ्या असलेल्या १५० केळींचे नुकसान झाले आहे. केळी शेतातच तुटून पडली. त्यामुळे शेतकरीवर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने जोरदार हजेरी लावली; त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. पाऊस चांगला झाल्याने शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
फोटो : १) बेल्हा (ता. जुन्नर) येथील केळीचे झालेले नुकसान.
२) गुळूंचवाडी (ता. जुन्नर) येथील सीताराम देवकर यांच्या आंब्याच्या झाडाच्या कैर्‍या गळून गेलेल्या दिसत आहे.

Web Title: Windy rain damages in Belha area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.