दिल्लीत थंडीनं तोडला गेल्या 22 वर्षांचा रेकॉर्ड, तापमान 12 डिग्रीच्या आसपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 08:29 AM2019-12-18T08:29:00+5:302019-12-18T08:29:08+5:30
दिल्लीत मोठ्या प्रमाणात शीतलहरी वाहू लागल्या असून, कमालीचा गारठा जाणवू लागला आहे.
नवी दिल्लीः दिल्लीत मोठ्या प्रमाणात शीतलहरी वाहू लागल्या असून, कमालीचा गारठा जाणवू लागला आहे. दिल्लीचं तापमान 22 अंश सेल्सियसच्या खाली गेलेलं नव्हतं. 27 वर्षांत दुसऱ्यांदा कमाल तापमान 12.2, तर किमान तापमान 10.4 एवढं नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत सूर्याची किरणंही दिल्ली-एनसीआरमध्ये दिसलेली नाहीत. बुधवारीही थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. थंडीनं दिल्लीकरांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. जवळपास कमाल तापमान 12.2 डिग्री सेल्सियस राहिलं आहे. तर किमान तापमान 10.4 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं होतं. स्वेटर परिधान केल्यानंतर ही लोक थंडावलेले आहेत. राजधानीचं तापमान इतर पर्वतीय भागांच्या तापमानापेक्षा कमी झालं आहे.
दिल्लीतल्या नजफगडमध्ये दिवसा कमालीची थंडी जाणवते आहे. इथे जास्त करून तापमान 11.1 अंश सेल्सियस राहिलं आहे. तसेच जफरपूर आणि मंगेशपूरमध्ये तापमान 11.6 डिग्री, पूसामध्ये तापमान 11.7 डिग्री अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 डिसेंबर 1997मध्ये राजधानीचं तापमान 11.3 डिग्री सेल्सियस नोंदवलं गेलं होतं. हवामान खात्याचे उपमहासंचालक डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या मते, पश्चिमी हिमालयाच्या क्षेत्रातून शीत लहरी दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातच आकाशात काळे ढग दाटून आल्यानं सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळेच ही थंडीची लाट कायम आहे.