देशात ‘हिवसाळा’; दक्षिणेत पाऊस, उत्तरेत बर्फवृष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 09:23 AM2022-11-14T09:23:00+5:302022-11-14T09:23:06+5:30
निम्मा नोव्हेंबर महिना निघून गेला आणि डिसेंबर जवळ येत आहे. मात्र, अद्याप थंडीचा विशेष परिणाम दिसून आलेला नाही. पर्वतांवर बर्फवृष्टी आणि दक्षिणेकडे पावसाने झोडपले आहे.
नवी दिल्ली : निम्मा नोव्हेंबर महिना निघून गेला आणि डिसेंबर जवळ येत आहे. मात्र, अद्याप थंडीचा विशेष परिणाम दिसून आलेला नाही. पर्वतांवर बर्फवृष्टी आणि दक्षिणेकडे पावसाने झोडपले आहे. पावसामुळे १८ नोव्हेंबरनंतर तापमानात काहीशी घसरण होऊ शकते. गेल्या वर्षीही भर थंडीत पाऊस झाल्याने वातावरण बदलाबाबत आता चिंता व्यक्त होउ लागली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यापासून राजधानी दिल्लीत पर्वतांवर बर्फवृष्टीचा प्रभाव दिसू शकतो. या आठवड्यात किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, १८ नोव्हेंबरनंतर तापमानात काहीशी घसरण नक्कीच होऊ शकते.
कुठे सुरू आहे पाऊस ?
या आठवड्यात आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम मुसळधार पावसाची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार, तेलंगणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.