गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 01:54 PM2017-11-09T13:54:28+5:302017-11-09T13:56:02+5:30

हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे.

Winter session of parliament due to elections in Gujarat and Himachal Pradesh? | गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?

googlenewsNext
ठळक मुद्दे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि

नवी दिल्ली- हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथील विधानसभांच्या निवडणुकांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन उशिरा सुरु होईल अशी शक्य़ता वर्तवण्यात येत आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन गुजरात निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यावरच सुरु होईल असे सरकारमधील काही उच्च सूत्रांनी सांगितल्याचे द इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत नमूद केले आहे.

या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन या महिन्यात सुरु होण्याची आजिबात शक्यता नसून गुजरात निवडणुकींचा शेवटचा टप्पा 12 डिसेंबरला संपल्यावरच ते सुरु होण्याची शक्यता आहे. साधारणतः संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून सुरु होते आणि ख्रिसमसच्या आसपास संपते. एका वृत्तसंस्थेने यापुर्वी यावर्षीचे हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असू शकते आणि त्याच्या तारखा संसदीय कामकाज विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतरच समजतील असे वृत्त प्रसिद्ध केले होते. संसदेतील बहुतांश सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असतील त्यामुळे सरकारने अधिवेशन पुढे ढकलावे अशी प्रतिक्रीया एका वरिष्ठ मंत्र्यांने मिंट वर्तमानपत्राकडे व्यक्त केली होती. संसदेतील भाजपा आणि कॉंग्रेसचे सदस्य गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असताना केवळ तिसऱ्या आघाडीचेच लोक संसदेत शिल्लक राहतील त्यामुळे बहुतांश सद्सय अनुपस्थित असताना चर्चा करणे अवघड होईल असे या मंत्र्यांने मिंटशी बोलताना सांगितले होते.

गुजरात-हिमाचल प्रदेशात कोण बाजी मारणार?

 हिमाचल प्रदेशात भाजपाचा भगवा ध्वज फडकण्याच्या तयारीत असला तरी गुजरातेत मात्र पक्षाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांना विजयरथ अखंडित ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये निवडणूक दौरे ज्या वेगाने चालवले आहेत, त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना सुखाने झोपही येईनाशी झाली आहे. गुजरातच्या आधी हिमाचल प्रदेशात मतदान होणार आहे. पण राहुल गांधी व काँग्रेसने सारी शक्ती गुजरातमध्ये लावली असून, हिमाचल प्रदेशला मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या खांद्यावर सोपवले आहे. हिमाचल प्रदेश आपल्या हातातून निसटत चालल्याची जाणीव काँग्रेस नेत्यांना झाली आहे. त्यामुळे चांगली शक्यता असलेल्या गुजरातेत अधिक प्रयत्न करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. काँग्रेसने गुजरात जिंकण्यासाठी जातींच्या समीकरणांच्या आधारे धोरणे आखली. गुजरातेत ४० टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. विधानसभेच्या एकूण १८२ जागा असून, मागासवर्ग ७५ जागांवर प्रभाव टाकू शकतो, हे पाहून राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचा नेता अल्पेश ठाकूर याला काँग्रेसमध्ये आणले. काँग्रेसचे दुसरे लक्ष्य होते पाटीदार (पटेल) समाज. त्यामुळे हार्दिक पटेल यांच्याशी चर्चा सुरू आहे.


 

Web Title: Winter session of parliament due to elections in Gujarat and Himachal Pradesh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.