winter session of Parliament: संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण काळ चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 07:32 AM2021-10-15T07:32:58+5:302021-10-15T07:33:21+5:30
winter session of Parliament: गेल्या वर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. यंदा मात्र कमी होत गेलेला संसर्ग आणि लसीकरणाचा वाढता वेग यांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण काळ चालेल आणि त्यात कपात केली जाणार नाही, असे जवळपास स्पष्ट झाले आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन घेता आले नव्हते. यंदा मात्र कमी होत गेलेला संसर्ग आणि लसीकरणाचा वाढता वेग यांमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन पूर्ण काळ चालेल आणि त्यात कपात केली जाणार नाही, असे जवळपास स्पष्ट झाले आहे,
संसदेचे अधिवेशन २२ नोव्हेंबरपासून सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र संसदीय कामकाज समिती याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेईल. भारतात आतापर्यंत जवळपास ९७ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यापैकी काहींना दोन्ही तर काहीेना पहिला डोस मिळाला असला तरी पुढील आठवड्यात लस मिळालेल्यांची संख्या १०० कोटींवर गेलेली असेल, हे नक्की. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत, म्हणजे जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू होणे अपेक्षित आहे, १२० कोटी भारतीयांना ही लस दिली गेलेली असेल. कोरोना संसर्गाचा धोका यांमुळे कमी होणार आहे. माजी संसद सदस्य व पत्रकारांना सेंट्रल हॉलमध्ये जाण्यास परवानगी नव्हती, एवढेच काय ते निर्बंध होते. आता मात्र देशभर निर्बंध कमी झाले आहेत. रेल्वे, बसेस, मेट्रो सेवा सुरू आहेत. सर्वत्र कोरोना नियमांचे जे पालन होते, ते संसद भवनात शिरतानाही होईल. पण पावसाळी अधिवेशनाइतकाही त्रास यावेळी होणार नाही, असे दिसते.