विंचूरला मूकमोर्चा, कडकडीत बंद
By admin | Published: October 11, 2016 12:03 AM2016-10-11T00:03:01+5:302016-10-11T01:13:08+5:30
विंचूर,: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे अत्याचार प्रकरणाचे येथे तीव्र पडसाद उमटले. विंचूर येथे कडकडीत बंद पाळण्यात येऊन तळेगाव प्रकरणातील आरोपीस कडक शासन व्हावे, अशी मागणी करीत घटनेचा निषेध नोंदवून गावातुन मूकमोर्चा काढण्यात आला. पोलिसांना निवेदन देऊन सणासुदीच्या पाश्वर्भुमीवर दुपारनंतर गावातील व्यव्हार सुरळीत करण्यात आले.

रविवारी रात्री बैठक घेऊन संबंधित आरोपीस कडक शासन झाले पाहीजे, अशी मागणी करीत सोमवारी घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आज सकाळपासूनच येथील तीनपाटीवरील सर्व दुकाने बंद असल्य़ाने गावातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथील नागरिकांनी येथील तीनपाटीवरु न मुक मोर्चास प्रारंभ केला. मारवाडी पेठ, आंबेडकर वेस यासह गावातील प्रमुख मार्गांवरु न मूकमोर्चा काढण्यात आला. व्यावसायिकांनी दुपारी बारा वाजेनंतर आपले व्यव्हार पूर्ववर सुरळीत चालु करण्याचे आवाहन करण्यात आले. बंदमुळे गावात दुपारपर्यंत शुकशुकाट जाणवत होता. (वार्ताहर)