विज्ञान आणि सत्य या मूल्यांच्या सहाय्यानं आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो : अझीम प्रेमजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:52 PM2021-05-12T20:52:53+5:302021-05-12T20:54:45+5:30
Coronavirus : कोरोनाच्या लढाईत विप्रो आणि अझीम प्रेमजी यांनी केली मोठी मदत. त्यांच्याशिवाय टाटा समूह, स्टेट बँक, अदानी, महिंद्रा, सिप्ला, वेदांता यांसारख्या समूहांनीही केली मदत.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. देशातून आणि देशाबाहेरूनही अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना विषाणूचा सामना करण्याची लढाई ही विज्ञान आणि सत्यावर आधारित असली पाहजे. तसंच याची पुनरावृत्ती होऊ नये हेदेखील आपण निश्चित केलं पाहिजे. याच मूल्यांच्या आधारावर आपण या महासाथीचा सामना करू शकतो, असं मत विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी (Wipro founder chairman Azim Premji) यांनी व्यक्त केलं.
"आपल्याला प्रत्येक पातळीवर तेजीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपले प्रयत्न हे विज्ञानावर आधारित असले पाहिजेत. तसंच या महासाथीचा सामना करण्यासाठी त्याचा विस्तार आणि प्रादुर्भावाच्या स्तरावर काम करावं लागेल," असंही अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केलं. एएनआयनं यासदंर्भातील वृत्त दिलं आहे. "अशा परिस्थितीत आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र राहावं लागेल. आपल्याला मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. यातच शक्ती आहे आणि जर याचा आपण वेगवेगळं राहून सामना केला तर आपल्याला संघर्ष करावा लागेल," असंही त्यांनी नमूद केलं.
सर्वात कमकूवत बाबीपर्यंत आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवं. याशिवाय कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थिती दु:खद झाली आहे. परंतु तुम्ही गावांकडे पाहा. जे गरीबीत जीवन जगत आहेत त्यांच्याकडे पाहा. सर्वकाही संपलं आहे. हे केवळ या महासाथीमुळे झालं नाही. तर अर्थव्यस्थेवर झालेल्या परिणामुळेही झालं आहे," असं त्यांनी नमूद केलं.
We must act with greatest of speed on all fronts & these actions must be based on good science. We must confront this crisis, its scale & spread truthfully. Science&truth are foundation on which we can tackle this crisis&ensure it's not repeated:Wipro founder-chairman Azim Premji pic.twitter.com/ZLoCAmkkjW
— ANI (@ANI) May 12, 2021
All of our actions must give priority to the vulnerable as they deserve. And also, we come out of this crisis & we need to restructure our society & economy as such that our country does not have this kind of inequity and injustice: Wipro founder-chairman Azim Premji
— ANI (@ANI) May 12, 2021
गरजवतांना प्राधान्य द्यावं
"गरजवंतांना मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. ते आपलं प्राधान्य असलं पाहिजे. महासाथीचा सामना केल्यानंतर आपल्याला समाज आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्निमाणाचं काम करावं लागेल. जेणेकरून कोणावरही असमानता किंवा अन्याय होऊ नये," असंही अझीम प्रेमजी म्हणाले.
कोरोना लढाईतही प्रेमजी यांची मदत
विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशननं पुण्यातील एका आयटी प्रकल्पाचं ४३० बेड्सच्या रुग्णालयात परिवर्तन केलं आहे. तर दुसरीकडे इन्फोसिसनं नारायण हेल्थच्या माध्यमातून बंगळुरूमध्ये १०० खोल्याचं कोविड रुग्णालय उभारलं आहे. याशिवाय टाटा समूहानं आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी ५ हजार बेड्स उपलब्ध करून दिले आहे. तर १ हजार क्रायोजनिक कंटेनर्सची आयातही केली आहे. याशिवाय स्टेट बँक, टेक महिंद्रा, सिप्ला, वेदांत, आयटीसी आणि अदानी समूहानंही मदत केली आहे.