निवृत्त न्यायाधीश बीसीसीआयला चालवणार असतील तर माझ्याकडून शुभेच्छा
By admin | Published: January 2, 2017 06:52 PM2017-01-02T18:52:10+5:302017-01-02T18:55:15+5:30
सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर खोचक टिप्पणी केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 2 - सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर खोचक टिप्पणी केली आहे निवृत्त न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआयचा कारभार योग्य रितीने चालणार असे सर्वोच्च न्यायालयाला वाटत असेल, तर त्यांना माझ्या शुभेच्छा, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
अनुराग ठाकूर यांनी ट्विटरव एक व्हिडीओ अपलोड करून न्यायालयाच्या निर्णयाबाबत आपले मत मांडले आहे. "मला भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची संधी मिळाली. प्रशासनिक दृष्ट्या गेली काही वर्षे भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगली राहिली आहेत. तसेच या काळात भारतीय क्रिकेटचा विकासही झाला आहे. बीसीसीआय खेळाचं उत्तम व्यवस्थापन करणारी संस्था आहे, तसेच जागतिक पातळीवर क्रिकेटच्या सर्वोत्तम सुविधा भारताकडे आहे. त्यामुळेच आजच्या घडीला जागतिक दर्जाचे अनेक खेळाडू भारतीय संघात आहेत," असे ठाकूर या व्हिडिओत म्हणाले.
My statement on the Supreme Court @BCCI verdict. pic.twitter.com/cXvEx6eIU4
— Anurag Thakur (@ianuragthakur) January 2, 2017
"न्यायालयाशी माझी वैयक्तिक लढाई नव्हती, तर ती एका क्रीडा संघटनेच्या स्वायत्ततेची लढाई होती, सर्वोच्च न्यायालयाच्या स्वायत्ततेचा मी सन्मान करतो. आता सर्वोच्च न्यायालयाला जर निवृत्त न्यायाधीशांकरवी बीसीसीआयचा कारभार चांगल्या पद्घतीने चालवता येईल, असे वाटत असेल तर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा., असा टोलाही अनुराग ठाकूर यांनी लगावला.