जादूटोणाविरोधी कायदा देशात व्हावा
By admin | Published: July 16, 2014 01:44 AM2014-07-16T01:44:35+5:302014-07-16T01:44:35+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन जादुटोणाविरोधी कायदा देशात लागू करण्याची विनंती केली.
नवी दिल्ली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन जादुटोणाविरोधी कायदा देशात लागू करण्याची विनंती केली.
डॉ. हमीद दाभोलकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रध्दा निर्मूलनाच्या लढ्याचा इतिहास राजनाथ सिंह यांना सांगितला. डॉ. दाभोलकरांची २० आॅगस्ट २०१३ रोजी हत्या झाल्यानंतर अजूनही आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. दाभोलकर यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारला जादुटोणाविरोधी कायदा लागू करावा लागला. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने डॉ. दाभोलकरांची मदत घेतली होती. हा कायदा डॉ. दाभोलकरांच्या नावाने ओळखला जात असला तरी त्यासाठी त्यांना प्राण गमवावे लागले,अशी खंत डॉ. हमीद व अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे ज्यांचे नुकसान होणार होते त्यांनी दाभोलकरांचा खून केल्याची शक्यता उपस्थितांनी गृहमंत्र्यांकडे व्यक्त केली. हा कायदा संपूर्ण देशात लागू होण होणे, हीच डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली ठरेल असे डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले.