बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 50 हजारावर

By admin | Published: February 20, 2017 08:39 AM2017-02-20T08:39:39+5:302017-02-20T11:22:03+5:30

आजपासून बचत खात्यातून आठवड्याला 50 हजारापर्यंत रक्कम काढणं शक्य होणार आहे

The withdrawal limit for savings account is now 50 thousand rupees | बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 50 हजारावर

बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आता 50 हजारावर

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - नोटाबंदी निर्णयानंतर बचत खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथील करण्यात आले असून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आजपासून बचत खात्यातून आठवड्याला 50 हजारापर्यंत रक्कम काढणं शक्य होणार आहे. यापुर्वी ही मर्यादा 24 हजार इतकी होती. 
 
नोटाबंदी निर्णयानंतर बँकेतून आठवड्याला फक्त 24 हजारापर्यंत रक्कम काढणं शक्य होतं. पण आता हा रकमेचा आकडा 50 हजार करण्यात आला आहे. बँकेतील बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार किंवा महिन्याला 96 हजार रूपये रक्कम खूपच कमी असल्यानं रिझर्व्ह बँक लवकरच हे निर्बंध उठवणार असल्याचं अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी काही दिवसांपुर्वी स्पष्ट केलं होतं.
 
(ऑपरेशन क्लीन मनी - नोटाबंदीनंतर 9 लाख बँक खाती संशयाच्या भोवऱ्यात)
(नोटाबंदी: बँकेत 2 लाख जमा करणारे आयकर विभागाच्या रडारवर)
(देशात चलनाबाबत स्थिती पूर्वपदावर)
 
13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अगोदरच यासंदर्भात घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. चलन तुटवडा असल्याने तसंच बँका आणि एटीएमबाहेर लोकांच्या रांगा लागल्याने बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. 
 

Web Title: The withdrawal limit for savings account is now 50 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.