पैसे काढण्याची मर्यादा 13 मार्चपासून संपणार

By admin | Published: February 8, 2017 03:37 PM2017-02-08T15:37:13+5:302017-02-08T16:04:32+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पैसे काढण्याच्या मर्यादेवरील निर्बंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

The withdrawal limit will end on March 13 | पैसे काढण्याची मर्यादा 13 मार्चपासून संपणार

पैसे काढण्याची मर्यादा 13 मार्चपासून संपणार

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पैसे काढण्याच्या मर्यादेवरील निर्बंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 20 फेब्रुवारीपासून तुम्हाला दोन टप्प्यात मोठी रक्कम काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठवड्याला बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असून, 50 हजार रुपये तुम्हाला काढता येणार आहेत. मात्र 13 मार्चनंतर बचत खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा पूर्णपणे संपुष्टात येणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे व्यापारी वर्गालाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

सध्या बाजारात 9.92लाख कोटी रुपयांच्या नव्या नोटा चलनात आहेत. तसेच आठवड्याला बचत खात्यातून 24 हजार रुपये काढता येण्याची मर्यादा आहे. चालू खात्यामधून ५० हजार रुपये काढण्याची मर्यादा १ लाख रुपये आधीच करण्यात आली आहे.

तसेच चलनटंचाईची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एटीएममधून प्रति दिवस दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची मुभा दिल्याने नागरिकांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी काहीसा दिलासा मिळतो आहे. 8 नोव्हेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरबीआयनं पैसे काढण्यावर मर्यादा घातली होती.

Web Title: The withdrawal limit will end on March 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.