जेडीयूतून शरद यादवांची होऊ शकते हकालपट्टी, पक्ष कारवाईच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 02:47 PM2017-08-10T14:47:37+5:302017-08-10T14:47:45+5:30

जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.

Withdrawal may lead to JD-U's Sharad Yadav, party gets ready for action | जेडीयूतून शरद यादवांची होऊ शकते हकालपट्टी, पक्ष कारवाईच्या तयारीत

जेडीयूतून शरद यादवांची होऊ शकते हकालपट्टी, पक्ष कारवाईच्या तयारीत

Next

नवी दिल्ली, दि. 10 - जनता दल संयुक्तचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. गुजरात राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या आमदारानं भाजपा उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. गुजरातमधील जेडीयूचा आमदार हा शरद यादव समर्थक आहे. तसेच शरद यादवही सार्वजनिकरीत्या मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या धोरणांवर टीका करत आहेत. याविरोधात ते आजपासून 12 ऑगस्टपर्यंत बिहारच्या सात जिल्ह्यांमध्ये जनसंवाद मोहीम उघडणार आहेत. तसेच 17 ऑगस्टला शरद यादव यांनी समान विचारधारा असलेल्या पक्षांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीपासून स्वतःला लांब ठेवत भविष्यातील राजकीय वाटचालीचा सूचक इशारा दिला आहे. दुसरीकडे पक्षाचा व्हिप झुगारून वसावातील आमदारानं काँग्रेसला मतदान केलं होतं. त्यामुळेच अहमद पटेलांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.  
बिहारमध्ये राजकीय भूकंप आल्यानंतरही मौनव्रत धारण करुन बसलेले जेडीयूचे वरिष्ठ नेता शरद यादव यांनी आता उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात झालीय. नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयावर शरद यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचा दौरा करत आपण लोकांशी संवाद साधणार असल्याचं शरद यादव यांनी सांगितलं आहे. शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, 'पाच वर्षांसाठी महाआघाडी करण्यात आली होती. 11 कोटी लोकांच्या विश्वासाला तडा गेला होता'. शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचं वृत्त येत होतं. आरजेडीसोबत आपली मैत्री संपवत भाजपाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे वाटचाल सुरू केल्याने शरद यादव नितीश कुमारांवर नाराज आहेत. दरम्यान शरद यादव जेडीयूमधून वेगळे होऊन आपला पक्ष उभा करतील अशा बातम्याही येत होत्या. जानकारांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, शरद यादव दौरा संपल्यानंतर एखादी मोठी घोषणा करू शकतात. 
 

Web Title: Withdrawal may lead to JD-U's Sharad Yadav, party gets ready for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.