10 दिवसांमध्ये एकच एटीएम दोनदा फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:45 AM2018-02-28T04:45:00+5:302018-02-28T04:45:00+5:30
बादशापूर परिसरातील एकच एटीएम मशिन चोरट्यांनी मागील १० दिवसांत दोन वेळा फोडल्याचे उघडकीला आले आहे. याची दखल घेत, पोलीस आयुक्तांनी सोमवारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुरगाव : बादशापूर परिसरातील एकच एटीएम मशिन चोरट्यांनी मागील १० दिवसांत दोन वेळा फोडल्याचे उघडकीला आले आहे. याची दखल घेत, पोलीस आयुक्तांनी सोमवारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
बादशापूरच्या बेगमपुरा खोटला गावातील टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशिन १३ फेब्रुवारी फोडण्यात आले होते. नंतर २२ फेब्रुवारीच्या रात्री हेच मशिन पुन्हा फोडण्यात आले. पोलीस आयुक्त संदीप खिरवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विष्णू प्रसाद यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मागच्या आठवड्यात एका बैठकीत खिरवार यांनी सांगितले की, एटीएमच्या संरक्षणाची जबाबदारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाºयावर आहे. एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसल्यास पोलिसांनी तिथे आपले शिपाई तैनात करावेत.
चोरीच्या घटनांत वाढ-
डिसेंबर महिन्यापासून गुडगाव परिसरात एकूण १० एटीएम फोडण्यात आले आहेत. प्रत्येक मशिनमधून ७ ते ८ लाख चोरीला गेले आहेत. यामुळे पोलीसही भांबावले आहेत.