बारा तासांच्या आत काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बंद

By Admin | Published: May 27, 2017 03:24 PM2017-05-27T15:24:37+5:302017-05-27T15:58:32+5:30

बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे.

Within 12 hours, Internet service in Kashmir is closed again | बारा तासांच्या आत काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बंद

बारा तासांच्या आत काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा पुन्हा बंद

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.27-   बारा तासांपूर्वी सुरू केलेली मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर सरकारला घ्यावा लागला आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद याला भारतीये सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याने जम्मू-काश्मीर सरकारने पुन्हा इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या महिनाभरापासून तेथे इंटरनेट सेवा बंद होती. एकुण 22 सोशल नेटवर्किंग साइट तेथे एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. 
 
इंटरनेट सेवा बंद करण्याचं कोणतंही कारण सरकारकडून देण्यात आलं नाही आहे. तसंच कधीपर्यत इंटरनेट बंद असेल, या बद्दलचीसुद्धा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या सुत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार, "दहशतवाद्याबरोबर झालेल्या चकमकीत सबजार अहमद मारला गेला. ही चकमक सुरु असताना दगड फेक करणारे व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवून अहमदच्या मदतीसाठी बाहेर येण्याचं आवाहन लोकांना करत होते. ही गोष्ट धोकादायक आहे अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. सबजार अहमदने काश्मीर खो-यात बुरहान वानीची जागा घेतली होती. 
 
दगडफेक करणारे व्हॉट्यअॅप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना एकत्रित होऊन रस्त्यावर येण्याचं आवाहन करत होते. सुरक्षा दलाकडून अहमद मारला गेला, या मेसेजमुळे काश्मिर खोऱ्यातील बरेच लोक रस्त्यावरही उतरले होते, अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे. 
 
जम्मू आणि काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मोबाईल इंटरनेटवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय जम्मू-काश्मिर सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी जेव्हा बुरहान वानी मारला गेला होता तेव्हा सरकारकडून 12 तास कोणत्याही प्रकारची पाऊलं उचलली गेली नव्हती, ज्यामुळे जम्मू-काश्मिर खोऱ्यात मोठा हिंसाचार झाला होता. काश्मीरमध्ये दोन वेगवेगळया चकमकींमध्ये आठ दहशतवादी ठार झाले आहेत. तसंच  त्रालमध्ये इमारतीत लपून बसलेले तिन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी हे ऑपरेशन केलं आहे. 
 

Web Title: Within 12 hours, Internet service in Kashmir is closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.