पंधरा दिवसांनी साधू बाबा जमिनीखालून जिवंत बाहेर आले
By Admin | Published: March 13, 2016 07:02 PM2016-03-13T19:02:08+5:302016-03-13T19:02:08+5:30
बिहार मधेपूरामध्ये १५ दिवस जमिनीखाली ध्यान लावणा-या एका साधू बाबांना रविवारी दुपारी सुखरुप बाहेर काढण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १३ - बिहार मधेपूरामध्ये १५ दिवस जमिनीखाली ध्यान लावणा-या एका साधू बाबांना रविवारी दुपारी सुखरुप बाहेर काढण्यात आले. प्रमोद बाबा असे या साधूंचे नाव असून, रविवारी दुपारी त्यांना जमिनीखालून जिवंत बाहेर काढण्यात आले.
आगामी श्री श्री विष्णू यज्ञ आणि श्रीराम कथा यज्ञ यशस्वी व्हावा यासाठी प्रमोद बाबांनी १५ दिवसांसाठी समाधी घेतली होती. जमिनीच्या १५ फूट खाली ते ध्यानाला बसले होते. २८ फेब्रुवारीला समाधी घेतांना त्यांनी ठराविक तारखेला बाहेर काढण्यास भक्तांना सांगितले होते.
त्यानुसार त्यांना आज बाहेर काढले. त्यावेळी तिथे असलेल्या तीन डॉक्टरांनी त्यांची प्रकृती तपासून ते ठणठणीत असल्याचे सांगितले. प्रमोद बाबांचे दर्शन घ्यायला गर्दी उसळल्याने चौसा- नौगचिया रोडवर गर्दी उसळली आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली आहे.