दोन तासात ४.८ मि.मी. पाऊस
By admin | Published: August 7, 2016 12:39 AM2016-08-07T00:39:34+5:302016-08-07T00:39:34+5:30
जळगाव : शनिवारी दिवसभर अधूनमधून झालेल्या जोरदार पावसाने शहरवासीयांना अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरात जागोजागी सखल भागात पाणी साचले होते. दुपारी साडे तीन ते साडेपाच या दोनच तासात ४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
Next
ज गाव : शनिवारी दिवसभर अधूनमधून झालेल्या जोरदार पावसाने शहरवासीयांना अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरात जागोजागी सखल भागात पाणी साचले होते. दुपारी साडे तीन ते साडेपाच या दोनच तासात ४.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. मध्येच ऊन तर मध्येच सरी तर अधूनमधून जोरदार पाऊस दिवसभर सुरू असल्याने आज खर्या अर्थाने शहरवासीयांना श्रावणसरीचा अनुभव आला. नवीपेठ व बजरंग पूल भागात तर पूरस्थिती निर्माण झाली होती. या भागात एवढे पाणी साचले की दुचाकी, पादचारी यांना मार्ग बदलावा लागला. चारचाकी नेतानाही अडचण येत होती. अशीच स्थिती गोलाणी मार्केटनजीक झाली होती. टप्पा-टप्प्याने पाऊसशहरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास व त्यानंतर पुन्हा अर्धा, एक-एक तासाने जोरदार पाऊस सुरूच होता. जोरदार पावसामुळे बजरंग बोगद्यातून अधिक वेगाने पावसाचे पाणी वाहत होते. स्टेडियम संकुलानजीक बसस्थानकाकडून येणार्या मुख्य रस्त्यावर प्रचंड पाणी साचले होते.दुपारी वाढला जोर...दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १३.७ मि.मी. पावसाची नोंेद झाली होती. त्यानंतर दोनच तासात त्यात ४.८ मि.मी.ची भर पडून साडेपाच वाजता हा पाऊस १८.५ मि.मी.वर पोहचला.