"दोन वर्षांच्या आत पेट्रोल-डिझेल वाहनांप्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत"; नितीन गडकरी यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 07:17 PM2024-09-10T19:17:30+5:302024-09-10T19:18:20+5:30
तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते.
पुढील 2 वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किमतीप्रमाणे होती, असे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच, अर्थमंत्र्यांनी ईव्हीवर सबसिडी दिल्याने आपल्याला कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते.
सांगितलं अशी कमी होईल EV ची किंमत -
गडकरी म्हणाले, "मी कोणत्याही प्रोत्साहनाच्या विरोधात नाही. हा विषय अवजड उद्योगमंत्र्यांचा आहे. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांवर अधिक प्रोत्साहन देण्याची इच्छा असेल तर, आपल्याला काही अडचण नाही. पण, मला वाटते की, उत्पादनाची संख्या वाढत आहे, यामुळे आपण अनुदानाशिवायही तो खर्च टिकवून ठेवू शकता कारण उत्पादन खर्च कमी आहे."
याशिवाय, इलेक्ट्रिक वाहने सहज उपलब्ध होत आहेत आणि दोन वर्षांच्या आत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किंमतीप्रमाणे होईल, असे मला वाटते. यामुळे त्यांना सब्सिडीची आवश्यकता नाही. कारण ईंधनाच्या रुपात इलेक्ट्रिकवर आधीच बचत होत आहे, असेही गडकरी म्हणाले.
मला सब्सिडीच्या बारतीत कसल्याही प्रकारची समस्या नाही -
गडकरी पुढे म्हणाले, 'मात्र यावरही अर्थमंत्री आणि अवजड उद्योगमंत्र्यांना सबसिडी द्यायची असेल आणि आपल्याला फायदा होणार असेल. मला काही अडचण नाही, मी विरोध करणार नाही." महत्वाचे म्हणजे, भारतात गेल्या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची हिस्सेदारी 6.3% होती, हे प्रमाण या पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत 50% अधिक आहे.