'लॉकडाऊन केले नसते, तर 15 एप्रिलपर्यंत देशात 8 लाखहून अधिक कोरोना रुग्ण झाले असते'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:46 PM2020-04-11T18:46:59+5:302020-04-11T22:11:47+5:30
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने फार चांगली पावले उचलली आहेत. 2 राज्यांत आणि केंद्र स्तरावर देशात केवळ कोरोनाशी संबंधित उपचारासाठी एकूण 587 रुग्णालये आहेत.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता 7,447 वर पोहोचली आहे. जर वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता, तर आज देशाचे चीत्र फार वेगळे राहिले असते. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी वेळीच लॉकडाऊनचा निर्णय घेतला नसता, तर कोरोना बाधितांचा आकडा 41 टक्क्यांनी वाढला असता आणि 15 अप्रिलपर्यंत हा आकडा तब्बल 8.2 लाखांवर पोहोचला असता, असे केंद्रिय आरोग्य मंत्रालयाचे जॉइंट सेक्रटरी लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Correction: Without this lockdown and without containment measures, India would have had 8.2 lakh cases by 15th April: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry #COVID19pic.twitter.com/VhJjwBE56k
— ANI (@ANI) April 11, 2020
'भारताने फार पूर्वीच महत्वपूर्ण निर्णय घेतले'
'कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने फार चांगली पावले उचलली आहेत. दोन राज्यांत आणि केंद्र स्तरावर, देशात केवळ कोरोनाशी संबंधित उपचारासाठी एकूण 587 रुग्णालये आहेत. याशिवाय देशभरात 1 लाख आयसोलेशन बेड आणि 11,500 आयसीयूदेखील तयार आहेत, असे अग्रवाल म्हणाले.
24 तासांत 1,035 नवे रुग्ण आढळले -
अग्रवाल म्हणाले, देशात आतापर्यंत एकूण 7,447 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यापैकी 643 जण बरे होऊन घरीही गेले आहेत. गेल्या 24 तासांत 1035 नवे कोरोनाबाधीत आढळून आले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत मृतांचा आकडा 239वर जाऊन पोहोचला आहे.
कोरोना टेस्टचा वेग वाढला -
आता देशात कोरोना टेस्टचा वेग वाढला आहे. गुरुवारी 16,002 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. तर शुक्रवारी 16,764 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकलच्या अभ्यासानुसार, देशात आतापर्यंत 1,71,718 सॅम्पलची तपासणी झाली आहे. हे काम 146 सरकारी तसेच 67 प्रायव्हेट लॅबमध्ये केले जात आहे.