Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंह विरोधात साक्ष, २ पैलवान, रेफ्रीसह ४ जणांनी सांगितली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 12:25 PM2023-06-03T12:25:28+5:302023-06-03T12:27:16+5:30
ब्रिजभूषण सिंह प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १२५ जणांची साक्ष घेतले.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी सुरू आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक, यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एप्रिलमध्ये दिल्ली पोलिसांनी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर येत आहे.
२ पैलवानांसहीत ४ जणांनी ब्रिजभूषण विरोधात साक्ष दिली आहे. साक्ष देणाऱ्यांमध्ये एक ऑलिम्पियन, एक राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता, एक आंतरराष्ट्रीय पंच आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक आहेत. या चौघांनीही किमान ३ महिला कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी ४ राज्यांतील १२५ लोकांचे जबाब नोंदवले असून हे चौघेही त्या १२५ लोकांपैकी आहेत.
२८ एप्रिल रोजी, दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध २ एफआयआर नोंदवले होते, यामध्ये व्यावसायिक मदतीच्या बदल्यात लैंगिक अनुकूलतेची किमान २ प्रकरणे, लैंगिक छळाची १५ प्रकरणे. १५ पैकी १० प्रकरणे चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, विनयभंगाची आहेत. अहवालानुसार, तक्रारकर्त्यांपैकी एकाच्या प्रशिक्षकाने सांगितले की, कुस्तीपटूने त्याला घटनेच्या सहा तासांनंतर ब्रिजभूषण सिंहबद्दल माहिती दिली.
ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी, दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भारतीय कुस्ती महासंघाकडून ज्या स्पर्धेत लैंगिक छळाची घटना घडली त्या स्पर्धेत उपस्थित असलेल्यांची माहिती मागवली आहे.
दोन्ही आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांच्या चौकशीत कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आणि सांगितले की, त्यांना एका महिन्यानंतर घटनेची माहिती मिळाली. दिल्ली पोलिसांसमोर साक्ष देणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेफरी सांगतात की त्यांना स्पर्धांसाठी परदेशात जाऊन महिला कुस्तीपटूंच्या स्थितीची माहिती मिळत होती.