पहाटे उठून विडी पेटवली, झाला मोठा स्फोट, मुलासह आई-वडील होरपळले, आसपासची घरे हादरली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 05:31 PM2023-06-06T17:31:34+5:302023-06-06T17:32:15+5:30
LPG Gas Leak: गुरुग्राममध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. गुरुग्राममधील सेक्टर ५ परिसरातील भाड्याने घेतलेल्या खोलीत गॅस लीक झाल्याने स्फोट झाला. त्यात पती पत्नी आणि त्यांचा १३ वर्षांचा मुलगा होरपळला.
गुरुग्राममध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. गुरुग्राममधील सेक्टर ५ परिसरातील भाड्याने घेतलेल्या खोलीत गॅस लीक झाल्याने स्फोट झाला. त्यात पती पत्नी आणि त्यांचा १३ वर्षांचा मुलगा होरपळला. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायबर सिटी गुरुग्राममधील सेक्टर ५ परिसरात झालेला हा स्फोट एवढा तीव्र होता की आजूबाजूची घरेही हादरली. सूचना मिळताचा अग्निशमन दलाची वाहने आणि सेक्टर-५ ठाणे पोलीस टीमचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आले. जखमींमध्ये एक १३ वर्षांचा मुलगाही आहे. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर मुलगा धोक्याबाहेर आहे.
मूळचे उत्तर प्रदेशमधील शहनाजपूर येथे राहणारे पप्पू हे इथे एक दुकान चालवतात. ते त्यांची पत्नी आणि मुलासोबत एका भाड्याच्या घरात राहतात. दरम्यानस रविवारी रात्री ते घरी झोपले होते. तेव्हा त्यांच्या घरात ठेवलेल्या एलपीजी गॅसमध्ये गळती झाली.
सकाळी सुमारे पाच वाजता पप्पू झोपेतून उठले. त्यांनी विडी पेटवली. विडी पेटवण्यासाठी आगपेटीची काडी पेटवताच घरात मोठा स्फोट झाला. आणि घरात आग लागली. हगा स्फोट एवढा मोठा होता की त्यात आजूबाजूची घरेही हादरली, असे पोलिसांनी सांगितले. स्फोट झाला तिथून पोलीस स्टेशन जवळच आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. तर मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.