भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप, पीडिता म्हणाली, तो आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 11:50 AM2018-05-30T11:50:08+5:302018-05-30T11:50:08+5:30

उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे.

Woman accuses BJP MLA from Badaun Kushagra Sagar of raping her | भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप, पीडिता म्हणाली, तो आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले  

भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप, पीडिता म्हणाली, तो आमदार झाल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले  

Next

लखनौ - उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. राज्यातील बदायूं जिल्ह्यातील बिसौली मतदारसंघातील भाजपा आमदार  कुशाग्र सागर याच्यावर एका स्थानिक तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. तसेच न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पीडित तरुणीने दिला आहे. 




 हे प्रकरण सर्वांसमोर आल्यापासून मला धमक्या देण्यात येत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र मला न्याय न मिळाल्यास मी आत्महत्या करेन, असे पीडित तरुणीने म्हटले आहे.  कुशाग्र सागर हा आमदार म्हणून निवडून आल्यापासून आपले आयुष्य बरबाद झाल्याचा आरोप तिने केला आहे.  ती म्हणते, माझे कुटुंब गरीब आहे. माझे वडील बेरोजगार असताना आई ग्रीन पार्क परिसरातील काही घरांमध्ये घरकामासाठी जात असे. तसेच मदतीसाठी मला नेत असे. 2016 साली मी केवळ 16 वर्षांची असताना मी सागरच्या घरी घरकाम करण्यासाठी जात असे. तेव्हाच माझी आणि त्याची ओळख झाली. सागर माझ्याशी बोलू लागला. तसेच त्याने माझ्याशी विवाह करण्याचेही वचन दिले. तसेच माझ्या असहायतेचा गैरफायदा घेऊन 2012 पासून 2014 पर्यंत अनेक वेळा माझ्यावर बलात्कार केला. दरम्यान, कुशाग्र सागर याचा अन्य तरुणीशी विवाह निश्चित झाला असून, 17 जून रोजी त्याचा विवाह संपन्न होणार आहे.

 
मात्र या आरोपांचे भाजपा आमदार कुशाग्र सागर यांनी खंडन केले आहे. "हे सगळे आरोप पूर्णपणे खोटे आहे, हे स्पष्ट आहे. माझी आणि पक्षाची प्रतिमा बिघडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मला 25 वर्षे होत आहेत आणि ही तरुणी मी 20 वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत आहे, असे सांगत आहे. असे असेल तर कुणीही कुणावरही बलात्काराचा आरोप करू शकतो. मी आमदार आहे म्हणून या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.  मी या प्रकरणाच्या चौकशीकी मागणी करतो. तसेच यात जो दोषी आढळेल त्याला शिक्षा व्हावी. जर मी दोषी असेन तर मला शिक्षा द्या आणि जर ही तरुणी दोषी असेल तर तिला शिक्षा व्हावी." असे आमदार कुशाग्र सागर यांनी म्हटले आहे. "तसेच 2014 साली सुद्धा सदर  तरुणीने माझ्यावर आरोप करण्याचा  प्रयत्न केला होता. मात्र सीओनीं केलेल्या चौकशीमध्ये हे आरोप बिनबुडाचे निघाले होते," असेही कुशाग्र सागर यांनी सांगितले.  

Web Title: Woman accuses BJP MLA from Badaun Kushagra Sagar of raping her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.