'बेंगळुरू विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी माझा शर्ट काढला...; महिलेचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 06:04 PM2023-01-04T18:04:02+5:302023-01-04T18:04:10+5:30
कर्नाटकमधील बेंगळुरू विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कर्नाटकमधील बेंगळुरू विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने विमानतळ प्रशानावर गंभीर आरोप केले आहेत. चेकींग दरम्यान विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी माझा शर्ट उतरवल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेवर बंगळुरु विमानतळ प्रशासनाने दु:ख व्यक्त केले आहे.
महिलेने मंगळवारी ट्विटर अकाऊंटवर ही घटना सांगितली आहे.'बंगळुरू विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान मला माझा शर्ट काढण्यास सांगण्यात आले. सुरक्षा चौकीवर फक्त अंगठी घालून उभे राहणे अत्यंत अनादरकारक आहे आणि कोणत्याही महिलेला असे करायचे नसते. तुम्हाला बेंगळुरू विमानतळावर महिलेला विवस्त्र करण्याची गरज का पडली?, असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.
विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर..
या ट्विटवर बेंगळुरू विमानतळाने उत्तर दिले आहे. 'असे घडायला नको होते, असे यात म्हटले आहे. बेंगळुरू विमानतळाने महिला प्रवाशाला संपर्क तपशील शेअर करण्याची विनंती केली जेणेकरून ते तिच्यापर्यंत पोहोचू शकतील. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही या त्रासाबद्दल दु:ख व्यक्त करतो आणि असे घडायला नको होते. आम्ही हा मुद्दा आमच्या ऑपरेशन टीमकडे मांडला आहे आणि सीआयएसएफ द्वारे व्यवस्थापित सुरक्षा दलाकडे देखील तो वाढवला आहे.
या महिलेने तिचे ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे, याचे कारण अजुनही समोर आलेले नाही. याआधीही विमानतळावरील सुरक्षा तपासणीबाबत गदारोळ झाला होता.