ओवेसींच्या मंचावर 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 11:20 AM2020-02-21T11:20:22+5:302020-02-21T11:42:01+5:30
'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
बंगळुरू - एमआयएमचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरुन वादंग सुरू असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगळुरूच्या सभेत गुरुवारी (20 फेब्रुवारी) गदारोळाची स्थिती निर्माण झाली होती. बंगळुरुमधील सीएएविरोधी मंचावरुन एका तरुणीने माईकवरुन 'पाकिस्तान झिंदाबाद' अशी घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ओवेसी आणि संयोजकांना मोठा धक्का बसला होता. 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
अमूल्या लियोना असं 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीचं नाव असून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या अमूल्याला गुरुवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. न्यायालयात हजर केलं. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमूल्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी मंचावर घडलेला या घटनेचा निषेध केला आहे.
Karnataka: Amulya (who raised 'Pakistan zindabad' slogan at an anti-CAA rally in Bengaluru, yesterday) & was charged with sedition, sent to 14-day judicial custody pic.twitter.com/vWS55tDZEQ
— ANI (@ANI) February 21, 2020
ओवेसी बंगळुरूच्या फ्रीडम पार्क येथे सीएएविरोधात रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी तेथे ही तरुणी देखील उपस्थित होती. कार्यक्रमाच्या मध्यभागी ती तरुणी स्टेजवर पोहोचली आणि माईकवर पाकिस्तान झिंदाबाद घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी ओवेसी स्वत: या तरुणीला रोखण्यास सरसावले त्यानंतर तिने 'हिंदुस्थान झिंदाबाद' अशी घोषणाबाजी सुरू केली.
'हिंदुस्थान झिंदाबाद आणि पाकिस्तान झिंदाबाद यात फरक आहे' असं ती तरूणी माईकवर बोलत होती. मात्र तिथल्या आयोजकांनी तिच्याकडून माईक हिसकायचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. हा संपूर्ण प्रकार पाहून ओवेसी स्तब्ध झाले आणि त्यांनी त्वरित त्यांनी स्पष्टीकरण दिले. 'ही सीएएविरोधी रॅली आहे. शत्रू देशाच्या बाजूने कोणत्याही घोषणेचे समर्थन केले जाणार नाही. आम्ही त्याचा निषेध करतो. हे खूप चुकीचे आहे. आमचा या तरुणीशी काही संबंध नाही भारत झिंदाबाद होता आणि झिंदाबाद राहील' असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.
सीएएविरोधातील मंचावरुन तरुणीचा 'पाकिस्तान झिंदाबाद' नारा; औवेसींनी काय केलं पाहा #CAA_NRC_Protestshttps://t.co/dMwqNdwoKD
— Lokmat (@MiLOKMAT) February 20, 2020
महत्त्वाच्या बातम्या
शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला
China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग
राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार
खुशखबर ! मार्चमध्ये स्वस्त होऊ शकतो घरघुती गॅस सिलेंडर; मागील 4 महिन्यांपासून होतेय दरवाढ
मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा