कर्तव्यनिष्ठेला सलाम! ... म्हणून चिमुकल्याला कुशीत घेऊन आई करतेय रिक्षाचालकाचं काम; 'ती'च्या संघर्षाची कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:50 PM2021-03-09T17:50:36+5:302021-03-09T17:54:16+5:30

Tara Prajapati : रिक्षा चालवून आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करत आहे. अनेकांनी ताराच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला असून सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे. 

woman auto driver drives by tying baby on stomach in chhattisgarh people in all praise for her fighter spirit | कर्तव्यनिष्ठेला सलाम! ... म्हणून चिमुकल्याला कुशीत घेऊन आई करतेय रिक्षाचालकाचं काम; 'ती'च्या संघर्षाची कहाणी 

कर्तव्यनिष्ठेला सलाम! ... म्हणून चिमुकल्याला कुशीत घेऊन आई करतेय रिक्षाचालकाचं काम; 'ती'च्या संघर्षाची कहाणी 

Next

नवी दिल्ली - प्रत्येक आई आपल्या मुलाच्या सुखासाठी वाटेल ते करते. त्याच्या आवडी निवडीचा प्रामुख्याने विचार करते. मुलांसाठी काबाडकष्ट करते. अशाच एका आईच्या संघर्षाची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आपल्या चिमुकल्याला कुशीत घेऊन आई रिक्षाचालकाचं काम करत आहे. बाळाला पोटाशी बांधून ती दिवसभर काम करते. तारा प्रजापती (Tara Prajapati) असं या आईच नाव आहे. ती छत्तीसगडच्या अंबिकापूर शहरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबीयांचा सांभाळ करत आहे. अनेकांनी ताराच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला असून सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या अंबिकापूर तारा प्रजापती राहते. आपल्या चिमुकल्याला पोटाशी बांधून ती दिवसभर रिक्षा चालवते. ताराचं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. दहा वर्षांपूर्वी लग्न झालं. तिचं जेव्हा लग्न झालं त्यावेळी तिच्या सासरची परिस्थिती बेताची होती. ताराचा पती रिक्षाचालक आहे. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी ताराने आपल्या पतीला साथ देण्याचा निर्णय आहे. त्याच्यासोबत स्वत: देखील रिक्षाचालकांचं ती सध्या काम करत आहे. 

कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणं गरजेचं

ताराची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. तिला एक बाळ आहे. मात्र, त्याच्याकडे लक्ष देणारं कोणी नाही. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवणं गरजेचं आहे. पतीसोबत मी देखील कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे. रिक्षा चालकाचं काम अजिबात सोपं नाही. मात्र, तरीही मला हे काम करावं लागतं. काम करताना मी माझ्या लहान मुलाची देखील काळजी घेते. त्यासाठी मी खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि पाण्याची बाटवी जवळ ठेवते अशी माहिती ताराने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वीज केंद्रात काम करणाऱ्या प्रगती सध्या 'करोना वॉरियर'

कोरोनाचं संकट देशावर असताना वीजेचं संकट ओढावू नये यासाठी वीज केंद्राचे कर्मचारी काम करत आहेत. याच दरम्यान एक महिला कर्मचारी आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन वीजपुरवठा कक्षात काम करत आहे. प्रगती तायडे असं महिला कर्मचाऱ्याचं नाव असून त्या आपल्या चिमुकलीसह आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. भोपाळच्या कोलार सब-स्टेशनमध्ये टेस्टिंग ऑपरेटर म्हणून त्या काम करतात. वीज केंद्रात येताना त्या आपल्या सहा महिन्यांच्या मुलीलाही सोबत घेऊन येतात आणि आपलं कर्तव्यही निभावतात.


वीज केंद्रात काम करणाऱ्या प्रगती सध्या 'करोना वॉरियर'आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत त्या ड्युटीवर असतात. चिमुकलीला घरी एकटं सोडू शकत नाही. त्यामुळे तिला सोबत आणण्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे आपलं कर्तव्यही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन सकाळीच कार्यालयात दाखल होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 'कठीण प्रसंगातही डॉक्टर, नर्स आणि पोलीस आपापलं कर्तव्य निभावत आहेत. अशा वेळी मी घरी कशी बसू शकते?, कोणाच्याही घरी अंधार पडू नये, यासाठी मला माझं कर्तव्य बजावणं आवश्यक आहे' असं प्रगती यांनी म्हटलं आहे. सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.

Web Title: woman auto driver drives by tying baby on stomach in chhattisgarh people in all praise for her fighter spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.