महिलेचा रुग्णालयात मृत्यू; घरी पोहोचताच झाली जिवंत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 07:02 AM2024-02-16T07:02:16+5:302024-02-16T07:02:47+5:30
झारखंडमधील गढवा येथे रामवती देवी आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या
मृत्यूनंतर पुन्हा जिवंत झाल्याची घटना बिहारमध्ये समोर आली आहे. येथे एका वृद्ध महिलेचा आधी मृत्यू झाला आणि तिला घरी आणल्यावर ती जिवंत झाली.
झारखंडमधील गढवा येथे रामवती देवी आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. ११ फेब्रुवारीला रामवतीदेवींची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय बिहारकडे रवाना झाले.
मृत घोषित केल्यानंतर सुमारे १८ तासांनंतर रामवतीदेवींचे पार्थिव बिहारमध्ये पोहोचले तेव्हा कुटुंबीयांना त्यांच्या शरीरात हालचाल दिसली. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले असता त्या जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता डॉक्टर रामवती देवींवर उपचार करीत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.