या महिलेने खोदली ६० फुटांची विहीर
By admin | Published: April 17, 2017 01:39 AM2017-04-17T01:39:23+5:302017-04-17T01:39:23+5:30
कर्नाटकातील सिरसी गावातील गौरी (५१) या महिलेला आता ‘लेडी भगीरथ’ म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे.
बंगळुरु : कर्नाटकातील सिरसी गावातील गौरी (५१) या महिलेला आता ‘लेडी भगीरथ’ म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. या महिलेने एकटीनेच ६० फुट विहीर खोदली असून त्याला चांगले पाणीही लागले आहे. पाण्याच्या त्रासाला कंटाळून गणेश नगर येथील गौरी या महिलेने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. तिच्याकडे पैसे नसल्याने तिने स्वत:च एकटीने हे काम करण्याचा निर्णय घेतला. दररोज पाच ते सहा तास काम करुन ती खोदकाम करत होती. तीन महिन्यानंतर तिच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि या विहिरीला सात फुटांपर्यंत पाणी लागले. खोदकामाच्या शेवटच्या टप्प्यात गौरी यांनी अन्य तीन महिलांची मदत घेतली. मजुरीचे काम करणाऱ्या या महिलेला एक मुलगी आहे. आपल्या घराजवळच तिचे सुपारीचे १५०, नारळाचे १५ आणि काही केळीची झाडे आहेत. गौरी यांच्या या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.