महिलेनं तीन डोकी असलेल्या बाळाला दिला जन्म; पाहण्यासाठी अख्खं गाव जमलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 05:56 PM2021-07-12T17:56:09+5:302021-07-12T17:57:26+5:30
तीन डोकी असलेल्या बाळाला पाहून रुग्णालयातील सगळेच चकीत; संपूर्ण पंचक्रोशीत बाळाची चर्चा
मैनपुरी: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एका महिलेनं तीन डोकी असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. या मुलाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी होत आहे. या बाळाबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा होत आहेत. या बाळाला अनेकजण देवाचा अवतार मानत आहेत. बाळ आणि बाळंतीण सुखरुप असून डॉक्टरांनी प्रसूतीनंतर त्यांना घरी पाठवलं.
मैनपुरीतील किशनी तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या गुलारियापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या रागिणी यांनी कुसमरा येथील रुग्णालयात तीन डोकी असलेल्या बाळाला जन्म दिला. बाळ जन्माला येताच त्याला पाहून डॉक्टर आणि नातेवाईक हैराण झाले. नऊ महिन्यांनंतर रागिणीची प्रसूती झाली. प्रसूतीपर्यंत सगळ्या गोष्टी सामान्य होत्या. सोमवार सकाळी तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर नातेवाईकांनी तिला कुसमरामधील रुग्णालयात दाखल केलं. रागिणीच्या प्रसूतीनंतर बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर नातेवाईक रागिणी आणि बाळाला घरी घेऊन गेले. तीन डोकी असलेल्या बाळाची बातमी गावात पसरली. बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. बातमी समजताच अनेक जण रागिणीच्या घरी धावले. सध्या तीन डोकी असलेलं बाळ कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.