अजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 11:05 AM2018-04-23T11:05:35+5:302018-04-23T11:05:35+5:30

सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजकांना संशय येऊ नये, म्हणून दोघींनीही पालकांना भाड्यावर आणलं होतं. 

Woman Get Married With Girl In Agra Of Uttar Pradesh | अजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव! 

अजब लग्नाची गजब गोष्ट... तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुलगीच झाली नवरदेव! 

Next

आग्रा : लग्नाच्य गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणातात. उत्तरप्रदेशमध्ये एका अजब लग्नाची गोष्ट समोर आली आहे. प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी ती मुलगा बनल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघींचे लग्नही झाले पण पण कुटुबियांनी आक्षेप घेतल्यानंतरही दोघींनी वेगळ होण्यास नकार दिला आहे.

उत्तरप्रदेशमधील आग्रामध्ये हा प्रकार घडला आहे.  या दोन्ही तरुणींचे कॉलेज जीवनापासून प्रेम संबंध होते. त्यावेळी दोघींनी लग्नाच्या आणा-भाकाही घेतल्या होत्या. त्यानुसार, 16 एप्रिल रोजी एका सामुदायिक विवाह सोहळ्यात दोन्ही तरुणींनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. लग्नासाठी या दोघींपैकी एकीने आपलं नाव सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह इच्छूक वर म्हणून नोंदवले होते. तर दुसरीने वधू म्हणून नाव नोंदवलं. विशेष म्हणजे, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजकांना संशय येऊ नये, म्हणून दोघींनीही पालकांना भाड्यावर आणलं होतं. 

दोघींच्या कुटुंबियांनी आपापल्या मुलींना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण दोघींनीही विभक्त होण्यास नकार दिला. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली. पण तरीही मुलींनी स्पष्ट नकार देत, एकत्र राहण्याच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली आहे. 

Web Title: Woman Get Married With Girl In Agra Of Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.