महिलेची शेवटची इच्छा; नातेवाईकांना न देता राम मंदिरासाठी दान केले ७ लाखांचे दागिने

By देवेश फडके | Published: February 16, 2021 04:55 PM2021-02-16T16:55:32+5:302021-02-16T16:58:06+5:30

अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यासाठी देशभरातून देणग्या गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे राहणाऱ्या एका राम भक्त महिलेने आपली शेवटची इच्छा म्हणून राम मंदिर उभारणीसाठी तब्बल ७ लाखांचे दागिने दान केल्याची माहिती मिळाली आहे.

woman give his all jewelry to ram mandir as per last wish at jodhpur | महिलेची शेवटची इच्छा; नातेवाईकांना न देता राम मंदिरासाठी दान केले ७ लाखांचे दागिने

महिलेची शेवटची इच्छा; नातेवाईकांना न देता राम मंदिरासाठी दान केले ७ लाखांचे दागिने

googlenewsNext
ठळक मुद्देराजस्थानमधील महिलेचे राम मंदिरासाठी दागिने दानमहिलेची शेवटची इच्छा कुटुंबीयांनी केली पूर्ण

जोधपूर : अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) बांधण्यासाठी देशभरातून देणग्या गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जानेवारीपासून हे काम सुरू झाले असून, काही ठिकाणी याला विरोध होताना दिसत आहे, तर काही ठिकाणी यावर टीका होत आहे. मात्र, अनेकांनी सढळ हस्ते देणगी दिल्याचेही समजते. राजस्थानमधील जोधपूर येथे राहणाऱ्या एका राम भक्त महिलेने आपली शेवटची इच्छा म्हणून राम मंदिर उभारणीसाठी तब्बल ७ लाखांचे दागिने दान केल्याची माहिती मिळाली आहे. (woman give his all jewelry to ram mandir as per last wish at jodhpur)

जोधपूर येथे राहणाऱ्या आशा नामक महिलेचे अलीकडेच निधन झाले. मात्र, मृत्युपूर्वी आपले सर्व दागिने राम मंदिरासाठी देण्याची शेवटची इच्छा त्यांनी कुटुंबीयांना बोलून दाखवली. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी सर्व दागिने राम मंदिर उभारणीसाठी द्यावेत, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. 

जोधपूर येथे राम मंदिर उभारणीसाठी देणग्या जमा करत असलेले प्रांत प्रचारक हेमंत यांनी यासंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले की, ०४ फेब्रुवारी २०२१ रोजी मला विजय सिंह यांचा फोन आला. माझी पत्नी आशा आपले सर्व दागिने राम मंदिरासाठी देऊ इच्छिते. मात्र, तिचे निधन झाले आहे. हीच तिची शेवटची इच्छा होती, असे त्यांनी फोनवर सांगितले. 

हेमंत यांनी विजय सिंह यांना विनंती केली की, आपण सर्वप्रथम आशा यांचे अंत्यसंस्कार पूर्ण करा. यानंतर आपण त्यांची अंतिम इच्छा पूर्ण करू. ०१ फेब्रुवारी रोजी आशा यांनी आपले पती आणि मुलगा मनोहर यांच्याकडे आपले सर्व दागिने राम मंदिर उभारणीसाठी देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यानंतर त्यांचे निधन झाले. आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार मनोहर यांनी केला. 

नाझींनी जर्मनीत केले, तेच RSS करतेय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका

आशा यांच्या कुटुंबीयांनी राम मंदिरासाठी देणगी जमा करणाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु, नियमानुसार राम मंदिरासाठी देणगी म्हणून दागिने स्वीकारले जाऊ शकत नाही. केवळ रोख स्वीकारली जाऊ शकते. ही बाब समजल्यावर आशा यांच्या कुटुंबीयांनी १५ तोळे सोने आणि २३ ग्रॅम चांदी यांची विक्री करून मिळालेली ०७ लाख ०८ हजार ५२१ रुपयांची रक्कम राम मंदिरासाठी दान केली.

Web Title: woman give his all jewelry to ram mandir as per last wish at jodhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.