VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 11:34 AM2020-05-22T11:34:18+5:302020-05-22T11:58:50+5:30
बराच वेळ सिंहांनी अँब्युलन्सचा रस्ता अडवून धरला होता. त्यांनी अँब्युलन्सभोवती फेऱ्या मारल्या. यामुळे शेवटी अँम्ब्युलन्समध्येच महिलेची प्रसूती झाली अन् तिने मुलीला जन्म दिला.
अहमदाबाद : गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक सिंहांचा कळप आल्यानंतर एक खळबळ उडाली आहे. गुजरातमधील गीरमधील गढडा जिल्ह्यातील भाका गावात राहणाऱ्या महिलेसोबत ही घडना घडली असून, महिलेला घेऊन जाणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीही या घटनेनं घाबरगुंडी उडाली आहे. बराच वेळ सिंहांनी अँब्युलन्सचा रस्ता अडवून धरला होता. त्यांनी अँब्युलन्सभोवती फेऱ्या मारल्या. यामुळे शेवटी अॅम्ब्युलन्समध्येच महिलेची प्रसूती झाली अन् तिने मुलीला जन्म दिला.
गुजरातमधील गीरमधील गढडा जिल्ह्यातील भाका गावात राहणारी महिला अफसाना सबरिश रफीक हिला 20 मे रोजी रात्री 10.20च्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. महिलेची तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी अँब्युलन्स बोलावण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने तातडीने 108ला कॉल केला आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच रुग्णवाहिका बोलविली. रुग्णवाहिका महिलेसह रुग्णालयाकडे निघताच 4 सिंहांच्या कळपानं गढड़ाहून उनाच्या रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अडवला आणि सगळ्यांचाच भीतीनं थरकाप उडाला.
Gujarat: A woman delivered a baby in ambulance, in the vicinity of the Gir forest after a group of four lions blocked their way to the hospital at midnight yesterday.#AIRPics: Rajesh Bhajgotar pic.twitter.com/K8XNyOgRtd
— All India Radio News (@airnewsalerts) May 21, 2020
महिलेची अँब्युलन्समध्येच प्रसूती झाली असून, महिलेनं एका मुलीला जन्म दिला आहे. दोघींची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या संपूर्ण घटनेवेळी सिंह गाडीच्या भोवती फेऱ्या मारत होते. मात्र कोणीही मोठ्यानं हालचाल केली नाही. त्यामुळेच सर्वजण सुखरूप बचावले. मुलीच्या जन्मानंतर काही वेळानंतर सिंह तिथून निघून गेले आणि नवजात बालिकेसह महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
हेही वाचा
CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार
जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी
घाबरू नका! पुन्हा येणाऱ्या कोरोना लाटेचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा