महिलांना मोठा दिलासा! रात्री-अपरात्री अडचणीत असाल तर करा 'या' नंबरवर फोन, लगेचच मिळेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 11:20 AM2021-03-01T11:20:37+5:302021-03-01T11:28:00+5:30

Woman Helpline Scheme : महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने देशभरात अनेक योजना चालवल्या आहेत.

woman helpline scheme where anyone can do complain know how to use your rights | महिलांना मोठा दिलासा! रात्री-अपरात्री अडचणीत असाल तर करा 'या' नंबरवर फोन, लगेचच मिळेल मदत

महिलांना मोठा दिलासा! रात्री-अपरात्री अडचणीत असाल तर करा 'या' नंबरवर फोन, लगेचच मिळेल मदत

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. बलात्कार, अत्याचार यासारख्या भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. मात्र याच दरम्यान आता एक दिलासादायक घटना समोर आली आहे. आपल्या देशात एकूण लोकसंख्येपैकी 49 टक्के महिला आहेत. सरकारने महिला सशक्तिकरण राष्ट्रीय धोरण 20 मार्च 2001 रोजीपासून राबवण्यास सुरुवात केली आहे. महिलांची प्रगती, विकास हे त्याचं उद्दीष्ट आहे. या धोरणाचं मूळ उद्दीष्ट म्हणजे स्त्रियांसह सर्व प्रकारच्या भेदभावाचा अंत करणं. 

महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने देशभरात अनेक योजना चालवल्या आहेत. मात्र आजही सातत्याने समोर येत असलेल्या उदाहरणांवरून महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मोठा प्रश्न आहे. आज त्यांच्याकडे सगळ्या सुविधा असल्या तरी महिलांवर होणारे अत्याचार सुरूच आहेत. महिलांना विविध समस्यांना सामोर जावं लागत आहे. यामुळे आता सरकारने महिलांच्या सोयीसाठी आणि त्यांना अडचणीच्या वेळी मदत करता यावी यासाठी काही हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. तसेच या नंबरवर फोन केल्यानंतर महिलांना तात्काळ मदत देण्यात येणार आहे. 

महिला हेल्पलाईन नंबर 1091/1090 हा संपूर्ण देशासाठी जारी करण्यात आला आहे. याशिवाय महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगामध्ये आपली कोणतीही माहिती द्यायची असेल तर त्यासाठी 0111-23219750 वर कॉल करू शकता. विशेष म्हणजे प्रत्येक राज्यांनी आपापल्या स्तरावर हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकावर कॉल करून लवकरात लवकर मदत मिळू शकेल. दिल्ली कमिशन फॉर वुमनकडून 01123378044/23378317/23370597 वर संपर्क केला जाऊ शकतो. पोलीस कंट्रोल रूम 100, चाइल्ड हेल्पलाईन 1098, अँटी स्टॉकिंग सेलकडून 1096 वर कॉल करून मदत मिळू शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भयंकर! मोठ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे नव्हते म्हणून आई-वडिलांनी लहान मुलीला 10 हजारांना विकलं अन्...

आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी पैशासाठी आपल्या मुलीला विकल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यामधील एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षीय मुलीला 10 हजारांत विकल्याची घटना समोर आली आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मोठ्या मुलीच्या उपचारासाठी लहान मुलीला विकल्याची माहिती मिळत आहे. मोठ्या मुलीवर उपचार करण्यासाठी आई वडिलांनी मुलीला शेजारी राहणाऱ्या 46 वर्षांच्या व्यक्तीला 10 हजार रुपयात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

Web Title: woman helpline scheme where anyone can do complain know how to use your rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.