दैवी चमत्कार! एका आठवड्यात आले चार हृदयविकाराचे झटके, तरीही वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 09:22 AM2022-02-13T09:22:47+5:302022-02-13T09:22:56+5:30
फोर्टिस हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ.वियुध प्रताप सिंह यांनी हे एक आव्हानात्मक आणि दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली: हृदयविकाराचा झटका(कार्डियाक अरेस्ट) आल्यास क्षणात माणसाचा जीव जाऊ शकतो. पण, अनेक प्रकरणांमध्ये एकपेक्षा जास्त झटके आल्यानंतरही माणसाचा जीव वाचतो. अशाच प्रकारची एक घटना दिल्लीत घडली आहे. एका क्षयरोगाने(टीबी) ग्रस्त असलेल्या 51 वर्षीय महिलेला एकाच आठवड्यात चार वेळा हृदयविकाराचा झटका आला. मात्र, महिला व्हेंटिलेटरच्या सपोर्टशिवाय बरी झाली.
महिलेचा रक्तदाव कमी होता
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फोर्टिस रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते. महिलेला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता आणि तिच्या संपूर्ण शरीरावर सूज येत होती. प्राथमिक तपासणीत महिलेच्या हृदयाभोवती द्रव जमा झाल्याचे समोर आले होते, यामुळे हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होऊन रक्तदाब कमी झाला होता.
टीबीचा यशस्वी उपचार होतो
महिलेचा रक्तदाब कमी करण्यासाठी औषधोपचार सुरू केले. तसेच, हृदयाची पंपिंग क्षमता पूर्ववत करण्यासाठी अँटी-ट्यूबरकुलर थेरपीही देण्यात आली, त्यानंतर महिलेला टीबी असल्याची पुष्टी झाली. डॉ. वियुध प्रताप सिंग(इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, फोर्टिस एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूट), म्हणाले, टीबी या आजारात प्रचंड ताप येते. टीबीची वेळीच ओळख पटवून उपचार करता येतो. पण, संबंधित महिला दुर्मिळ प्रकरणांपैकी एक असल्याचे डॉ.सिंग यांनी सांगितले.
महिलेला चार हृदयविकाराचे जटके आले
ते म्हणाले, "अँटी-ट्यूबरक्युलर थेरपी दरम्यान महिलेच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. उपचाराच्या पहिल्या आठवड्यात महिलेला चार हृदयविकाराचे झटके आले. तिला ह्रदयाचा मसाज आणि शॉक देण्यात आले, पण व्हेंटिलेटरच्या सपोर्टशिवाय ती महिला यशस्वीरित्या वाचली. सध्या महिलेच्या शरीरात विशेष प्रकारचे पेसमेकर आयसीडी बसवण्यात आले आहे. सध्या महिलेचा प्रकृती ठीक आहे.''