महिला मंत्र्याने मारली मदत मागणाऱ्याला लाथ
By admin | Published: November 1, 2015 11:55 PM2015-11-01T23:55:20+5:302015-11-01T23:55:20+5:30
मध्य प्रदेशच्या आरोग्य आणि पशुसंवर्धन मंत्री कुसुम मेहदेळे या आपल्या असंवेदनशील आणि उर्मट वागण्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.
शिव अनुराग पटैरया, भोपाळ
मध्य प्रदेशच्या आरोग्य आणि पशुसंवर्धन मंत्री कुसुम मेहदेळे या आपल्या असंवेदनशील आणि उर्मट वागण्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. रविवारी सकाळी मेहदेळे यांनी एका कार्यक्रमादरम्यान भीक मागणाऱ्या गरीब मुलाला मदत देण्याऐवजी लाथ मारून दूर झिडकारले. मेहदेळे यांचा हा उर्मटपणा मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि क्षणातच सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
रविवारी राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रमासाठी त्या पन्ना येथे पोहोचल्या होत्या. पन्नाच्या बस स्थानकावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम संपल्यानंतर त्या बाहेर येत असतानाच एक भिकारी बालक त्यांच्या पाया पडून पैसे मागू लागला. मात्र मेहदेळे यांनी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखविण्याऐवजी त्याच्या डोक्यात तडक एक लाथ मारली.
ही घटना घटनास्थळी हजर असलेल्या मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि क्षणात वृत्त वाहिन्यांवर प्रसारित झाली.