कोरोनामुळे नोकरी गेली, कुटुंब रस्त्यावर, 'तिने' हार नाही मानली; आता करते 'अशी' बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:57 PM2022-12-15T12:57:55+5:302022-12-15T13:03:17+5:30
कोरोनाच्या काळात सुदेशची नोकरी गेली होती, त्यानंतर तिच्याकडे ना रोजगार होता ना घरात खाण्यापिण्यासाठी रेशन होतं. अशा वेळीही सुदेशने हिंमत न हारता आपल्या वेगळा मार्ग निवडला.
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. कोरोनाच्या काळात सुदेशची नोकरी गेली होती, त्यानंतर तिच्याकडे ना रोजगार होता ना घरात खाण्यापिण्यासाठी रेशन होतं. अशा वेळीही सुदेशने हिंमत न हारता आपल्या वेगळा मार्ग निवडला. ज्यामुळे आता फक्त सुदेशचं कुटुंबच चालत नाही तर डझनभर महिलांनाही रोजगार मिळाला आहे. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अग्रसैन रोडवर राहणारी सुदेश ही विकास भवनात काम करायची, तर तिच्या पतीचा स्वतःचा व्यवसाय होता.
पतीला व्यवसायात तोटा झाला, तेव्हा सुदेशच्या नोकरीवरच घर चालायचे. 2020 मध्ये जेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी सुदेशचीही नोकरी गेली. सुदेशची नोकरी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर संकट आले. अशा परिस्थितीत सुदेशच्या पतीने तिला प्रोत्साहन दिले आणि पती-पत्नी दोघांनी मिळून टिफिन सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला. सुदेशने सांगितलं की, तिला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत होतं आणि तिचा नवरा त्यासाठी लागणारं सामान आणायचा.
ती जेवण बनवायची आणि पतीला द्यायची, तो त्यानंतर ग्राहकांच्या घरी टिफिन पोहोचवायचा. अशा रीतीने हळूहळू काम सुरू झाले, यानंतर त्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला. सुदेशने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांनी सुरुवातीला टिफिन सेंटर उघडले तेव्हा त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. ग्राहकांचेही ऐकावे लागले. त्यांनी त्यांच्या जेवणात सुधारणा केली आणि आज अशी वेळ आली आहे की त्यांच्या टिफिनच्या ग्राहकांची संख्या सतत वाढत आहे आणि व्यवसाय देखील चांगला चालला आहे.
कर्ज घेऊन आदित्य टिफिन कॅरिअरच्या नावाने टिफिन सेंटर सुरू केल्याचे सांगितले आणि या कामाचा विस्तार करताना स्वयंपाक आणि जेवण पोहोचवण्यासाठी कर्मचारी नेमले. काम वाढतच गेले, त्यामुळे स्टाफही हवा होता. आज त्याच्याकडे सुमारे 10 महिला आणि तीन पुरुष काम करतात, जे चांगले कमावतात. ज्या महिला कामासाठी येतात, त्या महिलांना काम शिकवणं हा त्यांचा उद्देश आहे, जेणेकरून त्या स्वावलंबी होऊ शकतील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"