मेघालयातील महिलेला हाकलले
By admin | Published: June 28, 2017 12:30 AM2017-06-28T00:30:18+5:302017-06-28T00:30:18+5:30
आपल्या राज्याच्या पारंपरिक वेषात दिल्लीच्या गोल्फ क्लबमध्ये एका मेजवानी समारंभाला गेलेल्या मेघालयातील महिलेला तिथून बाहेर काढण्यात आल्याने
नवी दिल्ली : आपल्या राज्याच्या पारंपरिक वेषात दिल्लीच्या गोल्फ क्लबमध्ये एका मेजवानी समारंभाला गेलेल्या मेघालयातील महिलेला तिथून बाहेर काढण्यात आल्याने ईशान्य भारतात संतापाची लाट उमटली आहे.
मेघालयाचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे, तर सदर महिलेने आपला अपमान करणाऱ्या क्लबवर कारवाई करावी, अशी मागणी मेघालयाच्या राज्यपालांकडे केली आहे.
मूळच्या मेघालयातील व खासी जमातीच्या टेलिन लिंगडोह या दिल्लीत राहतात. आसाम सरकारच्या आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. निवेदिता यांच्या मुलाच्या देखभालीचे काम करतात. डॉ. निवेदिता व श्रीमती टेलिन यांना गोल्फ क्लबचे अनेक वर्र्षापासून सदस्य असलेले पी. तिमय्या यांनी मेजवानी समारंभासाठी बोलावले होते. या समारंभाचे निमंत्रण एकूण आठ जणांना होते. टेलिन या समारंभाला मेघालयातील खासी समाजाची पारंपरिक वेषभूषा असलेला जेन्सम पेहराव परिधान करून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना बाहेर हाकलण्यात आले. या घटनेनंतर क्लबने दिलगिरी व्यक्त केली आहे.