'रिव्हॉल्व्हर' फिरवत इन्स्टाग्राम रील करणं पडलं महागात, महिला कॉन्स्टेबलचा राजीनामा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 08:56 AM2021-09-13T08:56:39+5:302021-09-13T08:58:03+5:30
police constable priyanka mishra resignation accepted : प्रियांकाने वर्दीत असताना हातात रिव्हॉल्व्हर धरल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील महिला कॉन्स्टेबल प्रियंका मिश्रा (Priyanka Mishra)हिचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर युनिफॉर्ममध्ये 'रिव्हॉल्व्हर' फिरवत एक रील तयार केला होता. त्यानंतर त्यांना लाइन अटॅच करण्यात आले होते. यानंतर प्रियांकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते, ज्यामुळे अस्वस्थ होऊन तिने राजीनामा दिला होता, तो आता मंजूर करण्यात आला आहे.
प्रियांकाने वर्दीत असताना हातात रिव्हॉल्व्हर धरल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिची स्टाईल एखाद्या गँगस्टर सारखी दिसत होती. ज्या ऑडिओवर तिने रील बनवला होता, त्यात असे म्हटले जात होते की, 'ना गुंडाईवर गाणे बनवत, ना जाट गुर्जर गाडीवर लिहत, आमच्याकडे पाच-पाच वर्षांची मुले कट्टा चालवतात'.
व्हिडीओ सेव्ह करणार होती महिला कॉन्स्टेबल, चुकून अपलोड झाले #Whatsapp स्टेटस, अन्... https://t.co/3eoqLLi7Xk
— Lokmat (@MiLOKMAT) September 13, 2021
या व्हिडीओची माहिती 24 ऑगस्ट रोजी वरिष्ठ पोलीस अधीक्षक आग्रापर्यंत पोहचली होती आणि तात्काळ कारवाई करत त्यांनी प्रियांका मिश्राला लाइनवर घेतले होते. प्रियंका मदन मोहन गेट पोलीस स्टेशनमध्ये तैनात होती. तिच्याविरोधात चौकशीही करण्यात आली होती.
या कारवाईनंतर प्रियंकाला सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले. लोक तिला पोलीस नोकरीतून काढून टाकण्याबद्दल बोलत होते. त्यानंतर, अस्वस्थ होऊन प्रियांकाने आणखी एक व्हिडिओ जारी केला, ज्यात तिला आग्रा एसएसपीकडे आपला राजीनामा सादर करण्यास सांगण्यात आले. तसेच ट्रोलर्सना अशा गोष्टी करू नये, असे आवाहन केले.