धक्कादायक! पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पोटच्या पाचही मुलांना मातेनं दिलं गंगेत फेकून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 08:30 AM2020-04-13T08:30:15+5:302020-04-13T08:31:35+5:30

पोलिसांच्या मदतीनं स्थानिक पाणबुड्यांकडून पाचही मुलांचा शोध घेतला जात असता, तिची मुलगी वंदना हिचा मृतदेह सापडला आहे. इतर मुलांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

UP woman throws her 5 kids into river vrd | धक्कादायक! पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पोटच्या पाचही मुलांना मातेनं दिलं गंगेत फेकून

धक्कादायक! पतीसोबत झालेल्या भांडणानंतर पोटच्या पाचही मुलांना मातेनं दिलं गंगेत फेकून

Next

भदोही : पतीसोबत झालेल्या वादानंतर एका महिलेनं पोटच्या पाचही मुलांना गंगेत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील भदोही जनपद येथील गोपीगंज पोलीस हद्दीतील जहांगीराबाद गंगा घाटावर घडलेली ही घटना परिसरात समजल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मदतीनं स्थानिक पाणबुड्यांकडून पाचही मुलांचा शोध घेतला जात असता, तिची मुलगी वंदना हिचा मृतदेह सापडला आहे. इतर मुलांच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.
 
ती महिला शनिवारी मध्यरात्री दोन वाजता मुलांना घेऊन गंगा घाटावर पोहोचली, तेव्हा तिचा पती घरी नव्हता. त्यानंतर तिनं एक एक करून पाचही मुलांना गंगेत ढकलून दिलं. या प्रकाराची गावात आणि कुटुंबीयांपर्यंत माहिती पोहोचल्यानंतर खळबळ उडाली. गावकऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिलेली असून, गोपीगंज पोलीस स्थानिकांच्या मदतीने मुलांचा शोध घेत आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र प्रसाद आणि पोलीस अधीक्षक राम बदन सिंग यांनीसुद्धा घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलांचा शोध घेण्याची प्रक्रियेला वेग आला असून, इतर मृतदेहसुद्धा लवकरच सापडतील, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

जहांगीराबाद गावात राहणाऱ्या मंजू यादव या महिलेनं हे निर्दयी कृत्य केलं आहे. वंदना (12), रंजना (10), पूजा (6), शिव शंकर (8) आणि  संदीप (5) अशी मुलांची नावं आहेत. पहिल्यांदा महिलेने आपल्या तीन मुलांना गंगेत फेकून दिलं, त्यानंतर अन्य दोन मुलांना गंगेत फेकून ती घरी निघून आली, अशी माहिती महिलेनं पोलिसांना दिली आहे. पोलीस आता प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: UP woman throws her 5 kids into river vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.